‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ नावाच्या एका सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. चार मुलींची आई असलेल्या एका महिलेच्या निर्घृण हत्याकांडावर आधारित ही सीरिज अॅमेझॉनवर प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज ९० च्या दशकात म्हैसूर राजघराण्याच्या माजी दिवाणाची नात शकीरा खलीली हिच्या हत्येवर आधारित आहे. ३१ वर्षांपूर्वी १९९१ मध्ये घडलेलं हे हत्या प्रकरण प्रचंड गाजलं होतं.
रोहित शेट्टीला आवडतो ‘हा’ मराठी अभिनेता, नाव सांगत म्हणाला…
शकीरा खलीलीला तिच्या पतीने जिवंत गाडलं आणि तिच्या थडग्यावर नाचून पार्टी केली होती. त्यामुळे या सीरिजचा ‘डान्सिंग ऑन द ग्रेव्ह’ असं नाव देण्यात आलं आहे. शकीरा प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब आणि काही गुपितेही दाखवली जाणार आहेत. शकीरा खलीली अचानक गायब होते आणि यामुळे संपूर्ण राजघराण्यात खळबळ माजते, असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
ब्रेकअप, कतरिनाच्या भावाशी अफेअर अन् आता लग्नापूर्वीच आई होणार इलियाना डिक्रूझ, चर्चांना उधाण
शकीरा खलीली ही म्हैसूर राजघराण्यातील माजी दिवाण यांची नात आणि रिअल इस्टेट डेव्हलपर होती. १९९१ मध्ये शकीरा खलीली एके दिवशी अचानक गायब झाली. नंतर तिच्या पतीने तिला जिवंत गाडल्याची माहिती समोर आली. शकीरा खलीलीने स्वामी श्रद्धानंद नावाच्या व्यक्तीशी लग्न केलेलं. हे तिचं दुसरं लग्न होतं. तिचं पहिलं लग्न चुलत भाऊ अकबर मिर्झा खलिलीशी झालं होतं. या लग्नातून शकीराला चार मुली झाल्या. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, परंतु नंतर नातं बिघडलं. लग्न मोडलं आणि काही महिन्यांनी शकीरा खलीलीने स्वामी श्रद्धानंदशी लग्न केलं.शकीराच्या मुली या लग्नाच्या विरोधात होत्या आणि त्यामुळे त्यांनी आईशी बोलणं बंद केलं. शकीरा स्वामींच्या प्रेमात होती, पण स्वामीची नजर मात्र तिच्या संपत्तीवर होती.
शकीरा खलिलीच्या मालमत्तेच्या लोभापोटी स्वामी श्रद्धानंदने तिची हत्या करून जिवंत गाडले. पत्नी शकीराला दफन केल्यानंतर स्वामी तिच्या समाधीवर खूप नाचायचा आणि पार्टी करायचा. हे सर्व तीन वर्षे सुरू होते, पण अचानक एके दिवशी बिंग फुटलं, त्यानंतर जे काही घडलं, त्यावर आधारित ही वेब सीरिज आहे.