Daredevil: Born Again Trailer : मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सने त्यांच्या बहुप्रतिक्षित सीरीज ‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’चा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्याची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. सुरूवातीला ‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’चा ट्रेलर १३ जानेवारीला २०२५ रिलीज होणार होता, परंतु लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे ट्रेलर रिलीज पुढे ढकलण्यात आला होता.
‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’मध्ये चार्ली कॉक्स पुन्हा एकदा मॅट मर्डॉक उर्फ डेअरडेविलच्या भूमिकेत झळकत आहेत. याआधी चार्लीने नेटफ्लिक्सच्या ‘डेअरडेविल’ सीरीजमध्येही हीच भूमिका साकारली होती. तसेच, व्हिन्सेंट डी’ऑनॉफ्रिओ विल्सन फिस्कच्या (मुख्य खलनायकाच्या) भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, जॉन बर्नथलही या सीरीजमध्ये पुनरागमन करत आहे. जॉनच्या प्रवेशामुळे ‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’मध्ये नवीन ट्विस्ट येईल, असे मानले जात आहे.
जबरदस्त अॅक्शन आणि थरारक स्टंट
‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’मध्ये जबरदस्त अॅक्शन आणि थरारक स्टंट्स असतील, ज्याची झलक ट्रेलरमध्ये दिसून येते. ट्रेलरमध्ये चार्ली कॉक्स उर्फ डेअरडेविल खतरनाक शैलीत गुन्हेगारांशी लढताना दिसत आहे. चाहत्यांना ट्रेलर खूप आवडला असून, आता त्यांना सीरीज रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. ही सीरीज ४ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर स्ट्रीम होणार आहे.
हेही वाचा…‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’ची स्टारकास्ट
‘डेअरडेविल: बॉर्न अगेन’च्यामध्ये चार्ली कॉक्ससह डेबोरा अॅन वोल, एल्डन हेनसन, निक्की जेम्स, मार्गारिटा लेव्हियेव्हा, जेनेया वॉल्टन, आर्टी फ्रूशन, क्लार्क जॉन्सन, मायकेल गंडोल्फिनी आणि जॉन बर्नथल यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.