यावर्षी शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. त्याआधी प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या दीपिका पदूकोणच्या ‘गहराइयां’ या चित्रपटाची चर्चा होती. नुकतंच या चित्रपटाला १ वर्षं पूर्ण झालं. यानिमित्त चित्रपटाच्या टीमने खास सेलिब्रेशनही केलं. शिवाय ‘रेड चिलीज व्हीएफएक्स’ने नुकतंच या चित्रपटातील काही सीन्सचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटातील बहुतांश सीन्स, बीचवरील सीन्स हे ग्रीन स्क्रीनच्या सहाय्याने चित्रित करण्यात आले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमच लोकांना ही गोष्ट ध्यानात आली आहे. या साध्या चित्रपटातही ज्या पद्धतीचे व्हीएफएक्स वापरण्यात आलेले आहेत ते पाहून लोकं आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण : नवाजुद्दीन सिद्दिकी आणि आलियामधला वाद DNA चाचणीपर्यंत का पोहचला आहे?

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या मेकर्सना ट्रोल केलं आहे तर काहींनी त्यांनी घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा केली आहे. चित्रपटातील अभिनेत्री अनन्या पांडे आणि निर्माता करण जोहर यांनी या चित्रपटातील काही आठवणी शेअर केल्या आहेत. फोटोज शेअर करत या दोघांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

विवाहबाह्य संबंधासारखा गंभीर विषय या चित्रपटातून हाताळण्यात आला होता. यातील बऱ्याच बोल्ड सीन्समुळे दीपिका पदूकोणवर बरीच टीकादेखील झाली होती. दीपिका बरोबरच सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, रजत कपूर, नसीरुद्दीन शाह यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.