दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आफताब अमीन पूनावाला या २८ वर्षीय तरुणाने श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केल्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्याने रचला होता. सहा महिन्यांनंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रेयसीचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आफताबला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफताब व श्रद्धा मुळचे वसईतील रहिवाशी होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध श्रद्धाच्या कुटुंबियांना मान्य नसल्याने ते २०१९पासून लिव्ह इनमध्ये राहत होते. मार्च महिन्यात कामानिमित्त ते दोघेही दिल्लीला स्थायिक झाले. लग्न करण्याचा तगादा लावल्याने श्रद्धाचा खून केला असल्याचं आफताबने पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आफताबने अनेक खुलासे केले असून ‘डेक्सटर’ ही अमेरिकन क्राइम सीरिज बघून खूनाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती त्याने दिली आहे. परंतु, ‘डेक्सटर’ सीरिज पाहून करण्यात आलेला हा पहिलाच खून नाही. याआधीही ‘डेक्सटर’ पाहून हत्याकांड झाल्याची माहिती आहे.

Shraddha Murder Case: ‘डेक्सटर’ वेब सीरिज पाहून केले प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे; पण या ‘Dexter’ ची कथा आहे तरी काय?

डेक्सटर पाहून केला भावाचा खून

२००९ मध्ये अमेरिकेतील इंडियाना राज्यातील अंन्ड्रयू कान्ले नामक तरुणाने त्याच्या १० वर्षीय भावाचा खून केला होता. डेक्सटर सारखी भावना मनात आल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.

गर्लफ्रेंडवर चाकूने वार

२०१४मध्येही अशीच एक घटना घडली होती. १७ वर्षीय स्टीव्हन माइल्सने डेक्सटर क्राइम सीरिज पाहून गर्लफ्रेंड एलिझाबेथ थॉमसवर चाकूने वार करत तिचा खून केला होता. त्याने केलेल्या या गुन्ह्यासाठी त्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हेही वाचा >> शिव ठाकरे-वीणा जगतापचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘ते’ फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात “गौतम-सौंदर्याची खिल्ली उडवणारा…”

वादातून आईचा खून

डेक्सटर क्राइम सीरिज पाहून घरकाम करणाऱ्या मार्क होवने त्याच्या आईलाच यमसदनी पाठवले. आईबरोबर धूम्रपान करणाऱ्यावरुन वाद झाल्याने तिचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली होती.

हेही वाचा >> तमन्ना भाटिया व्यावसायिकाबरोबर थाटणार संसार? फोटो शेअर करत म्हणाली…

चित्रपट दिग्दर्शकानेच केला खून

मार्क विचेल या कॅनाडियन दिग्दर्शकाने २०११ मध्ये जॉन नामक अनोळखी व्यक्तीचा खून केला होता. मार्कने डेक्सटरमध्ये दाखविल्याप्रमाणे रुम तयार केली होती. डेक्सटरचं शूटिंग करण्यासाठी रुम तयार केली असल्याचं सांगून त्याने त्याच रुममध्ये खून केला होता. या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तुरुंगातही तो डेक्सटर सीरिज पाहत होता.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi muder case not only aftab poonawalla murdered shraddha walkar by watching dexter details of other cases inspired by american crime series kak