Web Series and Movies Releasing on OTT Platform : मनोरंजन विश्वात या वर्षभरात बॉक्स ऑफिसवर आणि ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ‘पंचायत’, ‘लापता लेडीज’ अशा अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांनी ओटीटीवर धुमाकूळ घातला. अशातच आता सिनेमा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नव्या वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कल्कि 2898 AD’

बॉक्स ऑफिसवर ‘कल्कि’ चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. जर तुमच्याकडून ‘कल्कि’ चित्रपट पाहणं राहून गेलं असेल तर आता हा ( kalki 2898 AD ) चित्रपट तुम्ही हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर ( OTT Platform ) पाहू शकता. त्याशिवाय तामिळ, तेलुगु आणि मल्याळ्यम भाषेत हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल.

‘रायन’

धनुषचा ‘रायन’ चित्रपट आजपासून ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर ( OTT Platform ) पाहता येणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन स्वत: धनुषने केलं आहे. वरलक्ष्मी सरथकुमार, सरवणन, संदीप किशन, कालिदास जयराम आणि दुशारा विजयन हे कलाकार या ( Rayan ) चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. धनुषच्या चित्रपटांचं अर्धशतक झालं असून त्याच्या या ५०व्या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘रायन’ चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळ्यम आणि कन्नड भाषेतून पाहायला मिळेल.

‘फॉलो करलो यार’

‘फॉलो कर लो यार’ सीरिज आज अ‍ॅमेझॉनवर ( Amazon Prime ) प्रदर्शित झाली आहे. सोशल मीडिया सेन्सेशन असलेली उर्फी जावदेच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, उर्फीला येत्या काळात भारतातील किम कार्दशियन बनवण्याची इच्छा आहे. या ( Follow Karlo Yaar ) सीरिजची संपूर्ण कथा उर्फीच्या आयुष्याभोवती फिरणारी आहे.

हेही वाचा- ‘स्त्री २’ च्या यशानंतर श्रद्धा कपूरची ‘क्रिश ४’मध्ये वर्णी? महत्त्वाची माहिती आली समोर

‘द अ‍ॅन्ग्री यंग मॅन’

ही डॉक्युमेंटरी सीरिज २० ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर ( OTT Platform ) प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ७०च्या दशकात बॉलीवूडला लाभलेले दोन ‘द अ‍ॅन्ग्री यंग मॅन’ म्हणजेच जावेद अख्तर आणि सलीम खान. अमिताभ बच्चनपासून ते सलमान खानपर्यंत अनेक कलाकारांच्या यशाचं श्रेय या जोडीला जातं. म्हणूनच या डॉक्युमेंटरीची निर्मिती सलमान खान आणि झोया अख्तर यांनी केली आहे.

हेही वाचा – ‘स्त्री २’ चित्रपटाने मोडला ‘कल्कि’ आणि ‘पठाण’चा रेकॉर्ड, सलग आठव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘द अ‍ॅन्ग्री यंग मॅन’ या डॉक्युमेंटरीमध्ये ७०च्या दशकातील या गीतकार आणि निर्माता म्हणून बॉलीवूडमधल्या या जोडीच्या आयुष्यातील काही रंजक घटना यातून सांगितल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanush movie rayan and kalki release on amazon ott platform on 23 august tsg99