Dharmaveer 2 on OTT: प्रसाद ओक, क्षितीज दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘धर्मवीर २’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. २०२२ मध्ये ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ २७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर आला आहे.

प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने (Kshitij Date) साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे. हा चित्रपट आधी ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. राज्यातील अनेक भागांना पुराचा फटका बसल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
darlings badla merry christmas ott thriller movies
सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात? मग नक्की पाहा नेटफ्लिक्सवरील हे सिनेमे
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!

हेही वाचा – तोच कल्ला अन् तोच थरार! Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, नेटकरी म्हणाले, “केवळ हिंदीसाठी झुकलात…”

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना होण्याआधीच ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांना हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. प्रसाद ओक याने फेसबूकवर पोस्ट करून ‘धर्मवीर २’ ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. ‘ज्यांनी कधीच नाही केली तत्वांशी तडजोड, अशा धर्मवीर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची आहे ही गोष्ट… पाहा धर्मवीर २ फक्त ZEE5 वर,’ अशी पोस्ट प्रसाद ओक याने केली आहे. ‘धर्मवीर २’ आता ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

पाहा पोस्ट

Dharmaveer 2 on OTT
धर्मवीर २ ओटीटीवर (फोटो – झी 5

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार! कलर्सने केली मोठी घोषणा; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

‘धर्मवीर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. पहिल्या दिवशी ‘धर्मवीर २’ ने पहिल्या दिवशी १.९२ कोटी रुपये कमावले होते. २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असं निर्माते म्हणाले होते. तसेच सहा दिवसांत या चित्रपटाने १२.२८ कोटी रुपये कमावल्याची पोस्ट त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी केली होती. या चित्रपटाने एकूण १५.५ कोटी रुपये कमावले, असे वृत्त सॅकनिल्कने दिले आहे.

Story img Loader