समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. समांथा ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समांथाबरोबर या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवनही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘सिटाडेल’च्या प्रमोशनदरम्यानचा समांथा व वरुण धवनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘सिटाडेल’ वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी समांथा व वरुण धवन लंडनला गेले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये समांथा इंग्रजीत बोलताना दिसत आहे. तिच्या बाजूला वरुण धवन उभा असल्याचं दिसत आहे. ‘बॉलिवूड कॉर्नर’ या इन्स्टाग्राम पेजवरुन समांथा व वरुणचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>> “आमच्या पोटावर पाय…” शुबमन गिलच्या ‘त्या’ व्हिडीओवर आयुष्मान खुरानाची कमेंट, क्रिकेटर रिप्लाय देत म्हणाला…
समांथाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. समांथाचं इंग्रजी ऐकून वरुण धवनला हसू अनावर झाल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर काहींनी समांथा बरोबर इंग्लिश बोलत असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. समांथा व वरुणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हेही वाचा>> अमोल कोल्हेंनी शेअर केला अमित ठाकरेंबरोबरचा फोटो, कौतुक करत म्हणाले…
दरम्यान, ‘सिटाडेल’ ही मूळ हॉलिवूड वेब सीरिज आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. तर या वेब सीरिजच्या भारतीय व्हर्जनमध्ये समांथा व वरुण धवन असणार आहेत. या सीरिजच्या निमित्ताने समांथा व वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.