दिग्दर्शक अभिजित पानसे हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिजित पानसे हा विविध वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांची रानबाजार ही वेबसीरिज चांगलीच गाजली. त्यानंतर अभिजित पानसेंची राजी-नामा ही नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळाली. अभिजित पानसे हे आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्यांनी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
अभिजित पानसे हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती देताना दिसतात. नुकतंच अभिजित पानसे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी अश्विनीचा एक फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मला त्यांच्याबरोबर…” शिंदे गटात प्रवेश करण्याबद्दल अभिजित पानसे स्पष्टच बोलले
“कधी कधी मी स्वत:ला सहन करू शकत नाही….. तू २५ वर्षं कसं सहन केलंस ????!!!! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अश्विनी अभिजित पानसे”, असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : “आमच्या दोघांमध्ये भांडण…” अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले
दरम्यान अभिजित पानसे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या ‘रानबाजार’ ही वेबसीरिज त्यांनी दिग्दर्शित केली होती. याला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. ‘रानबाजार’मधील सत्तानाट्यानंतर ‘राजी-नामा’ ही वेबसीरिजही चांगलीच गाजली.