Disturbing Movies on OTT: आपण मनोरंजनासाठी चित्रपट पाहतो. आधी कोणताही नवीन चित्रपट आला की तो पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं लागायचं आता, घरात बसून तुम्ही जगभरातील अनेक नवनवीन सिनेमे ओटीटीवर पाहू शकता. अनेक चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. काही चित्रपट खूपच मनोरंजन करणारे असतात, पण काही चित्रपट मन हेलावून टाकणारे असतात, त्याचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होतो. ते पाहिल्यानंतर तुम्ही अस्वस्थ होऊ शकता आणि ते परिणाम तुमच्या मनावर दीर्घकाळ राहतात. काही धाडसी लोक असतात जे असे चित्रपट पाहू शकतात. तुम्हीही त्या धाडसी लोकांपैकी असाल तर ओटीटीवर हे तीन भयंकर सिनेमे उपलब्ध आहेत.

डॉगटूथ (Dogtooth)

हा एक ग्रीक चित्रपट आहे, ज्यामध्ये एका विखुरलेल्या कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यातील बाप आपल्या मुलांसाठी काय चांगलं, काय वाईट ते ठरवतो आणि त्यांना बाहेरच्या वाईट जगापासून वाचवण्यासाठी घरातच ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही मुलं वास्तविक जगापासून अनभिज्ञ असतात व एक खोटं जीवन जगत असतात. जसजसे ते मोठे होतात, तसतसं त्यांना घरातील हे वातावरण खटकतं व मग अशी कृत्ये करतात जे पाहून धक्का बसतो. या सिनेमात मन विचलित करणारी अनेक दृश्ये आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

द लास्ट हाउस ऑन द लेफ्ट (The Last House on The Left)

हा चित्रपट १९७२ साली आला होता व खूप वादग्रस्त ठरला होता. हा एक भयपट चित्रपट आहे, ज्यात मेरी कॉलिंगवूड आणि तिची मैत्रीण फिलिस यांची गोष्ट सांगण्यात आली आहे. मेरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरात जाताना वाटेत त्यांचा एका गुन्हेगारांच्या टोळीशी त्यांचा सामना होतो. ते दोघींचे अपहरण करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात आणि नंतर त्यांची हत्या करतात. या चित्रपटावर त्या काळात बंदी घालण्यात आली होती. २००९ मध्ये त्याचा रिमेक आला होता, पण मूळ चित्रपटच जास्त चांगला होता असं मत काही लोकांनी व्यक्त केलं होतं. हा सिनेमा Plex वर उपलब्ध आहे.

The Last House on The Left
द लास्ट हाउस ऑन द लेफ्टमधील एक दृश्य (फोटो- स्क्रीनशॉट)

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

इनफिनिटी पूल (Infinity Pool)

हा सिनेमा प्रवाशांवर झालेल्या गुन्ह्यांवर आधारित आहे. एक कादंबरीकार जेम्स फॉस्टर व त्याची पत्नी फिरायला जातात, तिथे त्यांना जेम्सची चाहती गॅबी व तिचा नवरा अल्बान भेटतात. गॅबी व अल्बानमुळे जेम्सच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊ लागतात, मग जेम्स चुकून एक खून करतो. यासाठी जेम्सला जी शिक्षा मिळते ती पाहणं खूप कठीण आहे.

तुम्हाला हा सिनेमा पाहायचा असेल तर तो जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.

Story img Loader