‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल तिचा एक्स बॉयफ्रेंड वरूण सुदशी ब्रेकअप आणि नवीन बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबरच्या साखरपुड्यामुळे खूप चर्चेत होती. दिव्या अपूर्वबरोबर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. नुकतेच ते एका कार्यक्रमात पोहोचले होते, यावेळी मीडियासमोर पोज देताना अपूर्व असं काही बोलला की त्याला ट्रोल केलं जातंय.

“ते मला किळसवाणे वाटतात”, नाना पाटेकरांबाबत डिंपल कपाडियांच्या वक्तव्याने उडाली होती खळबळ; म्हणालेल्या, “त्यांची भयंकर…”

दिव्या व अपूर्व पोज देत होते. यावेळी अपूर्वने दिव्याच्या गालावर किस केलं. किस करतानाच तो ‘मी रात्रभर करू शकतो’ (मी रात्रभर तिला किस करू शकतो) असं म्हणताना ऐकू येतो. ‘विरल भयानी’ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या दोघांवर संताप व्यक्त करत आहेत.

अपूर्वसाठी तिने वरुणची फसवणूक केल्याचं दिव्याने काही दिवसांपूर्वी मान्य केलं होतं, त्यावरून नेटकरी तिला सुनावत आहेत. ‘तुला खूप प्रामाणिक गर्लफ्रेंड भेटलीय,’ असं म्हणत एकाने अपूर्वची खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी ही विश्वास ठेवण्यासारखी मुलगी नाही, असं म्हटलंय.

divya troll
नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

दिव्या व वरुण एका शोमध्ये भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते व अचानक एकेदिवशी दिव्याने ब्रेकअपची घोषणा केली. नंतर काही दिवसांतच तिने अपूर्व पाडगावकरशी साखरपुडा केला.

Story img Loader