बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवालने सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच बिझनेसमन बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरशी साखरपुडा केला आहे. तिने अचानक साखरपुड्याची घोषणा करत दिव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अपूर्वशी साखरपुडा केल्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता दिव्याने याबाबत मौन सोडत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, “मला कोणाच्या प्रतिक्रियेवर भाष्य करायचे नाही. पण चाहत्यांकडून मला काही संवेदनशीलतेची अपेक्षा आहे. होय, यापूर्वीही माझ्या काही रिलेशनशिप्स झाल्या आहेत आणि मला त्या मान्य आहेत. पण याचा अर्थ असा नाही की लोकांना माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याची संधी देईन.”

आणखी वाचा : काम मिळत नव्हते म्हणून वैतागून धर्मेंद्र यांनी घेतलेला ‘हा’ मोठा निर्णय, पण…

पुढे ती म्हणाली, “आता माझा साखरपुडा झाला आहे आणि या विषयावर चाहत्यांनी थोडी संवेदनशीलता दाखवावी. मला सध्या माझ्या भूतकाळाबद्दल बोलायचे नाही. मी सध्या माझ्या आयुष्यात अपूर्वबरोबर खूप आनंदी आहे.”

हेही वाचा : Big Boss 16 : नव्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘हे’ १७ स्पर्धक?, मराठी ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाचाही समावेश

दिव्या अपूर्वला 2015 पासून ओळखते. २०१५ ते २०१८ च्या कार्तिक त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं. पण नंतर ते वेगळे झाले. मात्र दोघांनीही मैत्री कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघांमधील या मैत्रीचे प्रेमात रुपानंतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya agarwal gave reply to trollers who trolling her because of her engagement rnv