आज ओटीटी माध्यमावर जगभरातील वेब सीरिज, चित्रपट, माहितीपट अगदी सहज पाहू शकतो. ओटीटी माध्यमातील नेटाफिल्क्स ही एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. मध्यंतरी कंपनीने आपले अनेक वापरकर्ते गमावले होते. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर याचे वापरकर्ते आहेत, नेटफ्लिक्स सध्या भारतात आपले प्रस्थ निर्माण करत आहे. नुकतीच त्यांनी एक जाहिरात प्रदर्शित केली आहे ज्यावरून त्यांना ट्रोल केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या देशात लोक दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने नेटफ्लिक्सने एक जाहिरात आणली आहे जिला सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. लोकांचे म्हणणे आहे संकल्पना तयार करण्यापूर्वी किंवा कल्पना करण्यापूर्वी कोणतेही संशोधन केले गेले नाही. मात्र काहींनी या जाहिरातीला पाठिंबा दिला आहे.

दिवाळीच्या शुभेच्छा देत श्रेया घोषालने गायले ‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटातील गाणे; व्हिडीओ व्हायरल

या जाहिरातीत भारतातील मेघायलमधील चेरापुंजी येथील लोक दिवाळी कसे साजरे करतात हे दाखवण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. निर्मात्यांनी दिवाळी आणि पाऊस यांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि मुसळधार पाऊस असूनही स्थानिक लोक दिवाळी कशी साजरी करतात, फटाके फोडतात, दिवे लावतात, रांगोळ्या काढतात आणि पारंपारिक कपडे घालतात हे दाखवले आहे.

या जाहिरातीचा प्रामुख्याने विशेषत: स्थानिकांनी नेटफ्लिक्सला ट्रोल करायला सुरवात केली आहे. इतरांनी निदर्शनास आणून दिले की या प्रदेशात फटाके फोडले जात नाहीत आणि दिवाळीच्या सणाला स्थानिकांची संख्या फारशी नसते. काहींचे म्हणणे आहे की हिवाळ्यातील हवामानाची परिस्थिती जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे नसते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2022 netflix trolled for cherrapunji ki diwali advertisement netizens say zero research done meghalaya weather winter spg