टेलिव्हिजन क्वीन प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी नुकतीच एक मोठी बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. एकता कपूर आणि तिच्या आईने ओटीटी प्लॅटफॉर्म Alt Balaji च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २०१७ मध्ये हा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…मी ही किंमत मोजली”, पतीच्या पहिल्या घटस्फोटाला जबाबदार धरणाऱ्यांवर हंसिका मोटवानीचा संताप

एकता कपूरने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आता विवेक कोका यांची ALTBalaji चे नवीन चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असंही त्यात म्हटलं आहे. एकता कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर प्रेस रिलीज शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलंय की, “गेल्या वर्षी पायउतार होण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता ऑल्ट बालाजीकडे नवीन टीम आहे. इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विवेक कोका हे ALTBalaji चे नवीन चीफ बिझनेस ऑफिसर असतील, याची घोषणा करताना कंपनीला आनंद होत आहे. कोका यांच्या नेतृत्वाखाली, ALTBalaji दर्शकांना उच्च दर्जाचा, मूळ कॉन्टेंट पुरवण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चालू ठेवायचा आहे.”

Video: “तू नवी राखी सावंत” ड्रामा क्वीनशी तुलना झाल्यावर अर्चना गौतमने केलं असं काही…

एकता कपूरने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये “शुभेच्छा टीम ऑल्ट! जेव्हा गरज असेल तेव्हा तुमची पोस्ट शेअर करेन आणि तुम्हाला सपोर्ट करेन, चला नवीन मॅनेजमेंटचं स्वागत करुया.”

दरम्यान, एकताच्या या पोस्टवर सोनम कपूर आणि सुझान खान, हुमा कुरेशी सारख्या सेलिब्रिटींनीही कमेंट्स केल्या आहेत. तसेच एकताला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ektaa kapoor and shobha kapoor step down as heads of alt balaji announced vivek koka as chief officer hrc