‘बिग बॉस ओटीटी २’ हा ओटीटीवरील लोकप्रिय शो संपला आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसरे पर्वही चांगलेच गाजले. हा शो एल्विश यादवने जिंकला, तर अभिषेक मल्हान उपविजेता ठरला. फिनालेपूर्वी अभिनेषकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शोच्या फिनालेमध्ये तो थोडावेळ स्टेजवर दिसला होता. विजेत्याची घोषणा झाल्यानंतर लगेचच तो त्याच्या पालकांसह हॉस्पिटलला रवाना झाला होता.

अभिषेकची प्रकृती ठिक नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी त्याचे मित्र आणि चाहते प्रार्थना करत आहेत. मनीषा रानी, बेबिका धुर्वे, आलिया सिद्दीकी आणि आशिका भाटिया या बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी अभिषेकची रुग्णालयात भेट घेतली. पण विजेता एल्विश यादव मात्र अद्याप त्याला भेटायला गेला नाही. यामागचं कारण त्याने सांगितलं आहे.

kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
mp naresh mhaske marathi news
आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला – खासदार नरेश म्हस्के
Cafe Coffee Day, accountants,
सुजल्यावर कळतंय मार कुठे पडला!
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
IFA Officer Apala Mishra Success Story
UPSC परीक्षेत दोनदा अपयश, मित्रांकडून चेष्टामस्करी होऊनही हार मानली नाही; वाचा, कसा होता IFS अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास?
sharad pawar wrote letter to cm eknath shinde
Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

“सिस्टम हँग केलं ना…”, ‘बिग बॉस ओटीटी’चे विजेता एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “तुमच्या प्रेमाखातर ट्रॉफी…”

एल्विश यादव म्हणाला, “सोशल मीडियावर अनेक गोष्टी पसरवल्या जात आहेत. दोघांची बदनामी होत आहे. कधी माझ्या टीका होतेय, तर कधी अभिषेकवर. आमची मैत्री संपली असंही म्हटलं जातंय. काही जण म्हणतायत की सर्वजण त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले, पण मी का गेलो नाही. त्यांना मी सांगू इच्छितो की मी या चार भिंतीत बंद आहे हे तुम्ही पाहिलेच असेल. मी माझ्या स्वेच्छेने घरात बंद राहणार नाही, कारण मी बिग बॉसच्या घरात राहून आलोय. सुरक्षेच्या कारणांमुळे बिग बॉसच्या लोकांनी मला इथं ठेवलं आहे आणि मी बाहेर जाऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आहे. मी माझ्या मर्जीने इथे थांबलेलो नाही.”

आणखी वाचा : Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक; पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एल्विश यादव ठरला विजेता!

एल्विश पुढे म्हणाला, “मी अभिषेकशी फोनवर बोललो, तो म्हणाला की त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. मी आज जाणार होतो, पण आज माझ्या खूप मीटिंग्स होत्या. अशातच डिस्चार्ज मिळाल्यावर डायरेक्ट दिल्लीला जात असल्याचं अभिषेकने सांगितलं. मग मी म्हटलं की मी तुला थेट दिल्लीतच भेटेन. कारण तिथे जे प्रोटोकॉल आहेत ते पाळावे लागतात. सर्व काही माझ्या हातात नाही. त्यामुळे कृपया ती गोष्ट नकारात्मकतेने घेऊ नका आणि कोणाचाही द्वेष करू नका.”

Bigg Boss OTT 2च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानने केला खुलासा, म्हणाला, “जेलमध्ये…”

एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ८ आठवड्यांच्या खेळात चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. अभिषेक व एल्विश हे टॉप २ सदस्य होते, यापैकी एल्विशने बाजी मारली व ट्रॉफी जिंकली. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाने शो जिंकला.