Elvish Yadav Natasa Stankovic : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा सहा महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्याचा घटस्फोटानंतरचा वाढदिवस त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविक व एल्विश यादव यांच्यामुळे चर्चेत राहिला होता. ११ ऑक्टोबरला हार्दिकचा वाढदिवस होता, त्यादिवशी एल्विशने नताशाबरोबरची एक पोस्ट केली होती. त्यानंतर हार्दिकच्या चाहत्यांनी केलेल्या ट्रोलिंगबद्दल एल्विशने त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं, ते सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक व नताशा स्टॅनकोविक यांनी जुलै २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. ११ ऑस्टोबरला हार्दिकच्या वाढदिवसाच्या दिवशीच नताशा युट्यूबर व बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवबरोबर दिसली. दोघेही मुंबईती एका हॉटेलमध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले, त्यामुळे त्यांच्या डिनर डेटच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर एल्विशने नताशाबरोबरचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर हार्दिकच्या चाहत्यांनी या दोघांना चांगलंच ट्रोल केलं होतं. याबद्दल एल्विशने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”

एल्विश यादवने व्हिडीओ पोस्ट करण्याबाबत दिलं स्पष्टीकरण

एका मुलाखतीत एल्विश म्हणाला, “नताशाचं एक गाणं आलं होतं. त्या गाण्याच्या प्रमोशनसाठी मी गेलो होतो. त्यासाठी ती रील बनवली. मी संध्याकाळी ७-८ वाजता रील पोस्ट करतो. मी त्यादिवशी संध्याकाळी ७ वाजता पोस्ट केली आणि त्याच दिवशी हार्दिक पंड्याचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस आहे हे मला माहीत नव्हतं, पण हा विचार तिने करायला हवा होता. मला किमान सांगायचं तरी. मी व्हिडीओ टाकला आणि लोकांना वाटलं की मी हार्दिक पंड्याला पोक करतोय. पण का कुणाला पोक करेन, माझं काम प्रमोशन करणं आहे. मी प्रमोशन करून घरी आलो आणि त्याचे चाहते सक्रिय झाले. नताशाला आणि मला शिव्या घालू लागले.”

हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट

नताशा पंजाबी अल्बम ‘तेरे करके’ मध्ये झळकली होती. त्याच्या प्रमोशनसाठी एल्विश व नताशा यांनी एक व्हिडीओ शूट केला होता. “Vibin’ On A Whole New Level “❤️ असे कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या चाहत्यांनी या दोघांना ट्रोल केलं होतं. मात्र, तो व्हिडीओ फक्त प्रमोशनसाठी होता आणि त्यादिवशी हार्दिकचा वाढदिवस आहे, हे माहीत नव्हतं, असं एल्विशने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elvish yadav reacts on viral video with natasa stankovic ex husband hardik pandya birthday hrc