Park Min Jae Death: के-ड्रामा पाहणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लोकप्रिय कोरियन अभिनेता पार्क मिन जे याचं निधन झालं आहे. त्याने अवघ्या ३२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याची एजन्सी बिग टायटल आणि के-मीडियाने त्याच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.
पार्क मिन जे याने याने कमी वयातच दक्षिण कोरियातील मनोरंजन विश्वात नाव कमावलं होतं. त्याच्या गाजलेल्या काही के-ड्रामामुळे त्याचे जगभरात चाहते होते. के-मीडियाच्या वृत्तानुसार, त्याला २९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. तो चीनमध्ये असताना ही घटना घडली. त्याच्या कुटुंबियांनी आणि एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी इव्हा सियोल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
हेही वाचा – एक्स बॉयफ्रेंड व त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळलं, बॉलीवूड अभिनेत्रीच्या बहिणीला अटक
पार्क मिन जेच्या धाकट्या भावाने इन्स्टाग्रामवर ही दुःखद बातमी शेअर केली. “आमचा लाडका भाऊ आता आम्हाला कायमचा सोडून गेला आहे. त्याला शेवटचं भेटण्यासाठी जास्तीत जास्त लोक येतील, अशी आम्हाला आशा आहे”, असं त्याच्या भावाने लिहिलं.
हेही वाचा – अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
पार्क मिन जेने त्याच्या करिअरमध्ये अनेक लोकप्रिय के-ड्रामामध्ये काम केलं होतं. ‘टुमारो’, ‘लिटिल वुमन’, ‘कॉल इट लव्ह’, ‘द कोरिया-खितान वॉर’, ‘मि. ली’ आणि ‘बो-रा! ‘डेबोरा’सारख्या लोकप्रिय ड्रामामध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पार्क मिन जे याला २०२१ मध्ये IDOL: The Coup मधील भूमिकेतून विशेष ओळख मिळाली. अलीकडेच तो ‘स्नॅप आणि स्पार्क’ मध्ये झळकला होता.