यंदाचं बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वातील प्रत्येक स्पर्धेकांनं प्रेक्षकांची मनं जिंकली. सुरुवातीपासून हे पर्व चांगलंच चर्चेत राहिलं. आता टॉप पाच स्पर्धेकातून कोण यंदा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. पण त्यापूर्वी एक स्पर्धेक रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – …यामुळे खारुताईनं पूजा सावंतचा घेतला चार वर्ष बदला; कधी चावली, तर कधी अभिनेत्रीच्या कपड्यांच्या केल्या चिंद्या

पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे हे बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचे टॉप पाच स्पर्धेक आहेत. पण यामधील एका स्पर्धेकाला ग्रँड फिनालेपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर फुकरा इन्सान म्हणजे अभिषेक मल्हानला रुग्णालयात दाखल केलं असून तो घरातील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार नसल्याची माहित मिळतं आहे.

हेही वाचा – ‘त्या’ फोटोमुळे भार्गवी चिरमुले झाली होती ट्रोल, नेटकरी म्हणाले होते “मरा सिगारेट पिऊन”

अभिषेकची बहीण प्रेरणानं एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिनं अभिषेकच्या हेल्थची अपडेट देत लिहिलं आहे की, “अभिषेक ठीक नसून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचं आता समजलं आहे. त्यामुळे तो तुमच्यासाठी परफॉर्म करू शकणार नाहीये. त्यानं संपूर्ण पर्वात आपलं खूप मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आता त्याच्या आरोग्यात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा.”

अभिषेकच्या बहीणचं हे ट्वीट पाहताचा त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. “लवकर अभिषेक बरा हो,” अशा प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – पूजा सावंतच्या कुटुंबीयांना बिल्डिंगमधून हाकलून देण्याची मिळालेली ताकीद, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्रीनेच केला खुलासा

दरम्यान, आज बिग बॉस ओटीटीच्या या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रात्री ९ वाजल्यापासून रंगणार आहे. पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या स्पर्धेकांमधून आज बिग बॉस ओटीटी दुसऱ्या पर्वाचा विजेता मिळणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fukra insaan abhishek malhan admitted to hospital before bigg boss ott 2 grand finale pps