रामचरण आणि कियारा अडवाणीचा ‘गेम चेंजर’ बॉक्स ऑफिसवर मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला होता. पण प्रेक्षकांनी त्याला खूप थंड प्रतिसाद दिला. १० जानेवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने १२ दिवसांत देशभरात १४७ कोटी रुपये कमावले आहेत. निर्माते झालेल्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी लवकरच या चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होऊ शकतो.
शंकर यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘गेम चेंजर’च्या OTT रिलीजसंबंधी ‘OTT प्ले’ ने ही माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये ‘गेम चेंजर’च्या निर्मात्यांशी संबंधित एका जवळच्या सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, ‘चित्रपट निर्माते दिल राजू यांनी प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video बरोबर मोठा करार केला आहे. हा करार पक्का झाला आहे आणि ‘गेम चेंजर’ येत्या फेब्रुवारी २०२५ मध्ये प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.
‘गेम चेंजर’ OTT वर कधी आणि कुठे रिलीज होईल?
या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ‘गेम चेंजर’ १४ फेब्रुवारी २०२५ रोजी Prime Video वर प्रदर्शित होऊ शकतो. व्हॅलेंटाइन डे लक्षात घेतल्यास, हे राम चरण आणि कियारा आडवाणींच्या फॅन्ससाठी एक खास गिफ्ट ठरेल. पण, त्यात एक ट्विस्ट आहे. या चित्रपटाच OTTवर हिंदी डब वर्जन रिलीज होणार नाही असे बोलले जात आहे.
‘गेम चेंजर’च्या निर्मात्यांनी सध्या OTT रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण असा अंदाज आहे की, एकदा करार आणि रिलीजची तारीख निश्चित झाल्यानंतर या घोषणेला अधिकृत स्वरूप दिले जाईल.
‘गेम चेंजर’चा बजेट आणि कास्ट
‘गेम चेंजर’ ४५० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात रामचरण डबल रोलमध्ये आहेत, तर कियारा अडवाणी अंजलीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात एसजे सूर्या, श्रीकांत आणि जयराम देखील आहेत.