‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातील एका घटनेमुळे ती चर्चेत आली आहे. गहनाला तिच्या आयुष्यातील खरे प्रेम तिचा प्रियकर फैजान अन्सारीच्या रूपात सापडले आहे. एवढेच नाही तर दोघांनी लग्नही केले आहे, या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांपासून गहना फैजान अन्सारीसह रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीच उघडपणे काही चर्चा केली नव्हती पण आता व्हायरल होणारे फोटो पाहून गहनाच्या चाहत्यांना आनंदाचा धक्काच बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार गहनाने इस्लामिक रीतीनुसार विवाह केला आहे.

आणखी वाचा : “कोणत्याही स्टारकीडशी…” मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहचं नेपोटीजमबद्दल मोठं विधान

गहनाचा नवरा फैजान अन्सारी सोशल मीडिया स्टार आणि अभिनेता आहे. फैजान अलीकडेच ॲमेझॉन मिनी टीव्हीच्या रिॲलिटी शो ‘डेटबाजी’मध्ये झळकला होता. तर गहनावर वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाइटवर अपलोड केल्याचा आरोप झाला होता ज्यामुळे ती चर्चेत आली होती.

‘मिस आशिया बिकिनी पुरस्कार’ जिंकलेली गहना एक मॉडेल व अभिनेत्री आहे. तिने अनेक जाहिराती, हिंदी आणि तेलुगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. इतरही ॲडल्ट वेब सीरिजमध्ये ती झळकली आहे. याबरोबरच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या ओटीटी प्लॅटफॉर्म ३ अश्लील वेब सीरिजमध्येही गहनाने काम केलं होतं.