मराठी अभिनेता गश्मीर महाजनी एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. गश्मीर लवकरच एका वेब शोमध्ये झळकणार आहे. या शोचा पहिला टीझर समोर आला आहे, यामध्ये गश्मीरची दमदार भूमिका असल्याचं दिसत आहे. गश्मीरनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या आगामी शोचा टीझर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गश्मीरच्या आगामी शोचं नाव ‘गुनाह’ असं आहे. हा हिंदी शो आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये गश्मीरच्या पात्राची ओळख करून दिली जात आहे आणि शेवटी यात गश्मीर व अभिनेत्री सुरभी ज्योती या दोघांचे एकेक डायलॉग आहेत. ‘नाव अभिमन्यू नायक, वय ३२ वर्षे, नेटवर्थ ३०० कोटी, कुटुंबाची काहीच माहिती नाही, कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, तो कोणत्या हेतूने आला आहे याची कुणालाच कल्पना नाही,’ अशा संवादाने गश्मीरच्या पात्राची ओळख करून दिली जाते.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

या शोमध्ये गश्मीर अभिमन्यू नायक ही भूमिका साकारणार आहे. सुरभी ज्योती व गश्मीरचा हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर ३ जून रोजी प्रसारित होणार आहे. या शोचा टीझर सध्या खूप चर्चेत आहे. गश्मीरला एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा स्क्रीनवर पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. गश्मीरचे चाहते या व्हिडीओवर कमेंट्स करून त्याचं कौतुक करत आहेत.

Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर

दरम्यान, गश्मीर मागच्या जवळपास वर्षभरापासून स्क्रीनपासून दूर होता. जुलै महिन्यात त्याचे वडील व प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आईची खराब प्रकृती व इतर कौटुंबीक कारणांमुळे तो स्क्रीनपासून दूर होता. त्याने मोठा ब्रेक घेतल्याने त्याचे चाहते बऱ्याचदा त्याच्या आगामी शोबद्दल, कमबॅकबद्दल विचारत होते, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. त्याच्या ‘गुनाह’ या शोचा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

गश्मीर फक्त या शोमधूनच नाही तर एका लोकप्रिय रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो ‘खतरों के खिलाडी’ या शोच्या १४ व्या पर्वात दिसणार आहे. या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सर्व स्पर्धक परदेशात रवाना झाले आहेत. यामध्ये गश्मीर व्यतिरिक्त असिम रियाज,कृष्णा श्रॉफ, अभिषेक कुमार, अदिती शर्मा, करण वीर मेहरा, शिल्पा शिंदे, सुमोना चक्रवर्ती, निमृत कौर अहलूवालिया, आशिष मेहरोत्रा, नियति फतनानी, शालिन भनोट हे कलाकार यंदाच्या पर्वात दिसतील.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani new show gunaah promo video actor comeback after father ravindra mahajani death hrc