Movie Release October: सप्टेंबर महिना संपला आहे, सप्टेंबर महिन्यात अनेक सुपरहिट आणि मनोरंजक चित्रपट, वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाले. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यापासून ‘द ट्राइब’पासून ‘गोट’ आणि ‘सीटीआरएल’पर्यंत अनेक सिनेमे ओटीटीवर येणार आहेत. पाहुयात सिनेमांची यादी…

तुम्हाला ओटीटीवर चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुमच्यासाठी या आठवड्यात मेजवानी आहे. काही बहुचर्चित चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News : वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घौडदोड; १० दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

GOAT

थलपती विजयचा ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ म्हणजेच ‘GOAT’ हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. व्यंकट प्रभू दिग्दर्शित ‘गोट’ ओटीटीवर लवकरच रिलीज होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘गोट’ हा सिनेमा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे, अशातच त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

“घरातून प्रेतयात्रा चालल्यासारखं…”, अरबाज जाताना निक्कीच्या वागण्यावर पंढरीनाथ कांबळेचे परखड वक्तव्य

सीटीआरएल

अनन्या पांडेच्या या सीटीआरएलबद्दल लोकांमध्ये मोठी चर्चा आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. आता ४ ऑक्टोबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एआयची पॉवर दाखवण्यात आली आहे.

अमर प्रेम की प्रेम कहानी

‘अमर प्रेम की प्रेम कहानी’ या चित्रपटात तुम्हाला एक वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. यात एका मुलाची आणि मुलीची नाही तर दोन मुलांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट ४ ऑक्टोबरला जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल. आदित्य सील, सॅमी जोनास हेनी, सनी सिंह आणि प्रनूतन बहल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 तुषार कपूरची दोन फेसबुक अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाला, “माझी टीम…”

द ट्राइब

करण जोहर निर्मित ‘द ट्राइब’मध्ये इन्फ्लुएन्सर्सची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. काही एन्फ्लुएन्सर्स लॉस एंजेलिसमध्ये जातात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटचे शूटिंग कसे करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकतील.

द सिग्नेचर

अनुपम खेर यांचा ‘द सिग्नेचर’ हा मराठी चित्रपट ‘अनुमती’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ४ ऑक्टोबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट झी 5 वर प्रेक्षकांना पाहता येईल. महिमा चौधरी, नीना कुलकर्णी, अन्नू कपूर आणि रणवीर शौरी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader