लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता गोविंदा(Govinda) व त्याचा भाचा कृष्णा अभिषेक(Krushna Abhishek) हे सातत्याने त्यांच्या खासगी वादामुळे सतत चर्चेत असलेले पाहायला मिळतात. त्यांच्यातील वाद, आरोप-प्रत्यारोप चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता मात्र चाहत्यांना कृष्णा अभिषेक व गोविंदा यांना एकत्र पाहायला मिळाले आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये गोविंदाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच या दोघांनी स्टेज शेअर केल्याचे पाहायला मिळाले. विनोद, गमती-जमतींबरोबरच दोघांनी त्यांच्यातील सात वर्षांपासून असलेला दुरावा संपविण्याचे ठरविले. गोविंदाने त्याच्या पायाच्या दुखापतीवर विनोद केल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच कृष्णाला त्याच्या पत्नीची म्हणजे सुनिता अहुजाची माफी मागण्यास सांगितले. जरी दोघांमध्ये मतभेद असले तरी कृष्णावर सुनिता अहुजाचे प्रेम असल्याचे गोविंदाने खात्रीने सांगितले.

“…तेव्हा हा खूप रडला होता.”

कृष्णा अभिषेकने गोविंदाचा हात हातात घेऊन त्याला स्टेजसमोर नेले. त्यांनी ‘फिल्मों के सारे हिरो’ या गाण्यावर एकत्र डान्स केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कृष्णाने गोविंदाला घट्ट मिठी मारत ‘मामा नंबर १’ असे म्हटले. या शोमध्ये पुढे पाहायला मिळाले की, कृष्णा अभिषेकने चिकन लेग पिसवर विनोद केले. यावेळी गोविंदाने त्याला चिडवत म्हटले, “जेव्हा मी पायावर गोळी मारली आणि मला दवाखान्यात दाखल केले तेव्हा हा खूप रडला होता. आता हा लेग पिसवर विनोद करत आहे. मी जरा आणखी जोरात गोळी मारली असती तर पायाचे किती तुकडे झाले असते याची कल्पना करा.”

इन्स्टाग्राम

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये कृष्णा अभिषेकने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्याने म्हटले, “आजचा दिवस हा आठवणीत राहणाऱ्या दिवसांपैकी एक आहे. मी सात वर्षांचा वनवास आज पूर्ण केला आहे.” हे ऐकल्यानंतर गोविंदाने म्हटले, “माझी मोठी बहीण मला माझ्या आईसारखी होती. कृष्णा तिचा मुलगा आहे. माझ्याकडून कधीही वनवास नव्हता. तो माझी मिमिक्री करत होता, म्हणून एकदा त्याच्यावर खूप रागावलो होतो, त्यामुळे तो माझ्यापासून दूर राहिला. मात्र, माझ्या पत्नीने मला सांगितले की संपूर्ण इंडस्ट्री तेच करत आहे, तुम्ही कृष्णाला काही म्हणू नका, त्याला पैसे कमवू द्या.”

पुढे गोविंदाने कृष्णा अभिषेकला पत्नी सुनिता अहुजाची माफी मागण्यास सांगताना म्हटले, “तिची माफी माग. ती तुझ्यावर प्रेम करते.” यावर कृष्णाने म्हटले, “मीदेखील तिच्यावर प्रेम करतो, मी दुखावलं असेल तर माफी मागतो.”

हेही वाचा: Video: ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अमोलने शेअर केला अप्पी माँ बरोबरचा व्हिडीओ; ‘बुलेटवाली’ गाण्यावरची रील पाहून चाहते म्हणाले…

२०१६ मध्ये एका शोमध्ये गोविंदाने कृष्णा अभिषेकला त्याच्यावर केलेल्या विनोदाला मान्यता दिली नव्हती. तेव्हापासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये गोविंदाने चुकून स्वत:वर गोळी झाडल्यानंतर कृष्णा अभिषेकने त्याची भेट घेतली.दरम्यान, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये गोविंदाबरोबरच चंकी पांडे व शक्ती कपूर यांनीदेखील प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.