कोविड काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्यापेक्षा जगभरातील कलाकृती घरबसल्या बघणं पसंत करत आहेत. यामध्येही भारतात खासकरून सस्पेन्स थ्रिलर प्रकारचा कंटेंट ओटीटीवर सर्वात जास्त बघितला जातो असं स्पष्ट झालं आहे. प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या पठडीतील बरेच चित्रपट आणि वेबसीरिज सापडतील. त्यापैकीच एक वेबसीरिज म्हणजे ‘दुरंगा’.

याच वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘झी५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘दुरंगा’ ही सीरिज प्रदर्शित झाली. सुरुवातीला या सीरिजकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही, पण नंतर याबद्दल बरीच चर्चा व्हायला लागली. प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवण्यात या सीरिजला चांगलंच यश मिळालं. झी५ वर सर्वात जास्त पाहिलेल्या वेबसीरिजमध्ये या सीरिजची गणना होत आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

आणखी वाचा : कतरिनाला आहे हॉरर चित्रपटांची ॲलर्जी; ‘या’ दिग्दर्शकाबरोबर काम करायची व्यक्त केली इच्छा

एक वेगळी मर्डर मिस्टरी आणि त्यामागचा थरार या सीरिजमध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला होता. या थराराबरोबरच इरा, संमित आणि त्यांच्या कुटुंबाची हृदयाला स्पर्श करणारी कहाणीसुद्धा प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली. टेलिव्हिजनमधून घराघरात पोहोचलेली दृष्टी धामीच्या कामाची चांगलीच प्रशंसा झाली. या सीरिजमध्ये तिने एका पोलिस अधिकारिणीची भूमिका निभावली होती.

या सीरिजचा हा पहिला सीझन एका रहस्यमय वळणावर येऊन थांबल्याने प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. नुकताच या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झी५ च्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन करण्यात आली आहे. या नवीन सीझनमध्ये या कथेतील आणखी काही रहस्यं आपल्यासमोर उलगडणार आहेत. यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. या सीरिजमध्ये गुलशन देवैया, अमित साध, दृष्टी धामी, अभिजीत खांडकेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतील.

Story img Loader