‘शाहिद’, ‘ओमेरता’सारखे चित्रपट आणि ‘स्कॅम १९९२ – अ हर्षद मेहता स्टोरी’सारखा जबरदस्त वेबसीरिज देणारे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी गेल्या काही वर्षात प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. त्यांच्या ‘स्कॅम १९९२’ या वेबसीरिजने तर साऱ्या देशाला वेड लावलं. प्रत्येकाने त्या सीरिजचं तोंडभरून कौतुक केलं. आता हंसल मेहता त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी सज्ज आहेत.
हंसल मेहता लवकरच ‘गांधी’ ही त्यांची सर्वात महत्त्वाकांक्षी अशा वेबसीरिजवर काम सुरू करणार आहेत. या वर्षाअखेरपर्यंत ते या सीरिजचं चित्रीकरण सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अप्लॉज एंटरटेंमेंट या निर्मिती संस्थेकडूनच या वेबसीरिजची निर्मिती केली जाणार आहे.
आणखी वाचा : Pathaan Controversy : ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचं हिंसक आंदोलन पाहून पूजा भट्ट संतापली; ट्वीट करत म्हणाली..
हंसल यांची महात्मा गांधी यांच्या जीवनावर बेतलेली ही वेबसीरिज रामचंद्र गुहा यांच्या ‘Gandhi – The year that changed the world’ या पुस्तकावर आधारित आहे. शिवाय यामध्येसुद्धा मुख्य भूमिकेसाठी प्रतीक गांधीलाच घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या भूमिकेसाठी हंसल आणि प्रतीक भरपूर उत्सुक आहेत.
या वेबसीरिजची तयारी सुरू आहे आणि लवकरच याचे काही अपडेट लोकांसमोर येतील हे स्पष्ट झालं आहे. याबरोबरच हंसल मेहता त्यांच्या ‘स्कूप’ आणि ‘स्कॅम २००३ – अ तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजच्या कामात व्यस्त आहेत. शिवाय ते करीना कपूरबरोबर एका चित्रपटावरही काम करत आहेत.