Lootere Trailer: ‘स्कॅम १९९२’ आणि ‘स्कूप’सारख्या सुपरहीट वेबसीरिज देणाऱ्या हंसल मेहता यांच्या आगामी ‘लुटेरे’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. याचे दिग्दर्शन कमल जय मेहता करत आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या या सीरिजचा ट्रेलर आज बुधवारी प्रदर्शित झाला असून तो जबरदस्त अॅक्शन आणि सस्पेन्सने भरलेला आहे. ही सीरिज सागरातील लुटारूंवर आधारित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्राइम थ्रिलर वेब सिरीज ‘लुटेरे’च्या ट्रेलरची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. हा थरार आणि ॲक्शनने भरलेला ट्रेलर पाहून चाहत्यांच्या या सीरिजबाबतच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. ही मालिका २२ मार्च २०२४ पासून डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, सोमालियाच्या समुद्री लुटारूंच्या तावडीत सापडलेली एक भली मोठी कार्गो शिप आणि काही बंधक यांना सोडवण्यासाठीचा संघर्ष आणि त्यामागील राजकारण या सीरिजमधून समोर येणार आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या दणदणीत यशानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी तिरूमला मंदिरात केले केस अर्पण; व्हिडीओ चर्चेत

एका भारतीय जहाजावर सोमालियाच्या लुटारूंनी केलेला हल्ला अन् त्यानंतर काही भलत्याच गोष्टींचा होणारा उलगडा, एक रहस्यमयी डील अन् त्याया जहाजाशी असलेला संबंध अशी भन्नाट कथा हंसल मेहता यांनी सादर केली आहे. वरवर पाहता ही सीरिज हॉलिवूड स्टार टॉम हँक्स यांच्या ‘कॅप्टन फिलिप्स’ या चित्रपटाचा रिमेक वाटते, पण या चित्रपटातून फार कमी भाग या सीरिजमध्ये घेण्यात आला आहे. कारण या सीरिजमध्ये सोमालियाच्या समुद्री लुटेऱ्यांव्यतिरिक्त आणखी एक वेगळाच सस्पेन्स आणि कथानक दडलेलं ट्रेलरमध्ये दिसत आहे.

या सीरिजमध्ये यात रजत कपूर, विवेक गोंबर, अमृता खानविलकर आणि आमिर अलीसारखे दमदार कलाकार दिसणार आहेत. ‘लुटेरा’ व्यतिरिक्त, हंसल सध्या त्यांच्या आगामी ‘द बकिंघम मर्डर्स’ या चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. या चित्रपटात त्यांनी प्रथमच करीना कपूरसह काम केलं आहे. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली असून तो चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hansal mehtas upcoming lootere series trailer out now avn