गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रीक्वलची म्हणजेच ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ची चांगलीच चर्चा होती. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे कट्टर फॅन्स तर या सिरिजची आतुरतेने वाट बघत होते. इतरही प्रेक्षक अगदी आवडीने ही सीरिज बघत आहेत आणि त्याविषयी बोलत आहेत. २२ ऑगस्टपासून ही सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली आणि लोकांनी तिला उत्तम प्रतिसाद दिला.
या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. याच्या नव्या सीझनबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. ‘एचबीओ’चे प्रमुख यांनी ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’चा पुढील सीझन कधी येणार याबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “जवान प्रदर्शित करा, नाहीतर…” वाढदिवशी शाहरुख खानने नेटफ्लिक्सला धरलं वेठीस; व्हिडीओ चर्चेत
‘न्यू यॉर्क प्रेस इवेंट’मध्ये ‘एचबीओ’चे प्रमुख यांनी ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’चा दूसरा सीझन २०२४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. आमरिकेतील उन्हाळी सुट्टीदरम्यान हा दूसरा सीझन प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पहिला सीझन अत्यंत थरारक वळणावर संपल्यानंतर प्रेक्षकांना याचा दूसरा सीझन कधी येतो याची उत्सुकता लागली होती.
या वेबसीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या कथेच्या २०० वर्षं आधीची गोष्ट सांगण्यात येणार आहे. जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या ‘फायर अँड ब्लड’ या कादंबरीवर ही वेबसीरिज बेतलेली आहे. ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ ही वेबसीरिज अमेरिकेत HBO Max या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आणि भारतात हॉटस्टारच्या माध्यमातून ती लोकांसाठी उपलब्ध करून दिली होती, पण आता बहुतेक ‘जिओ सिनेमा’ने ‘एचबीओ’चे हक्क घेतल्याने ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’चा दूसरा सीझन आपल्याला ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.