संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट म्हटलं की भव्यदिव्य सेट, राजवाडे, भरजरी दागिने अन् कपडे यांचा मिलाफ त्यात हमखास पाहायला मिळतोच. हीच परंपरा त्यांनी ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये कायम ठेवली आहे. या सीरिजची प्रदर्शनाच्या आधीपासूनच जोरदार चर्चा होती. या सीरिजचं बजेटही खूप जास्त आहे. या सीरिजसाठी कुणाला किती मानधन मिळालं, हीरामंडीचं बजेट किती, संजय लीला भन्साळींनी दिग्दर्शनासाठी पैसे आकारले, याबाबत ‘मनी कंट्रोल’ने वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हीरामंडी’ या बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी यांनी ओटीटी पदार्पण केलं आहे. त्यांचं दिग्दर्शन असलेली ही सीरिज नेटफ्लिक्सवर १ मे पासून प्रसारित होत आहेत. महागडे खरे दागिने, भरजरी कपडे, आलिशान महाल अन् अवाढव्य सेट या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. पण ही सीरिज फक्त याच गोष्टींमुळे नाही तर कलाकारांच्या मानधनामुळेही चर्चेत आहे. ‘मनी कंट्रोल’च्या वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनासाठी अंदाजे ६० ते ७० कोटी रुपये आकारले. ‘हीरामंडी’चं बजेट २०० कोटी रुपये आहे.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

कोणाला किती मानधन मिळालं?

सोनाक्षी सिन्हा

रेहाना आणि फरीदान या दुहेरी भूमिकेसाठी सोनाक्षीने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. ‘हीरामंडी’ च्या सर्व स्टारकास्टपैकी सर्वाधिक पैसे सोनाक्षी सिन्हाला मिळाले. तिने या सीरिजसाठी तब्बल दोन कोटी रुपये आकारले.

या आठवड्यात OTT वर आलेत जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वीकेंड मनोरंजक करण्यासाठी वाचा कलाकृतींची यादी

मनीषा कोईराला

मनीषा कोईराला या वेब सीरिजमधील मुख्य चेहरा आहे. तिला या पात्रासाठी एक कोटी रुपये मानधन देण्यात आलं.

अदिती राव हैदरी

या वेब सीरिजमधील कामासाठी अदिती राव हैदरीला एक ते दीड कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे. यात तिने मल्लिकाजानची मोठी मुलगी बिब्बोजानचं पात्र साकारलं आहे.

१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर

रिचा चड्ढा

रिचाने यात लाजवंती उर्फ लज्जोची भूमिका साकारली आहे. तिला मनीषाच्या बरोबरीने मानधन देण्यात आलं. तिला या सीरिजसाठी एक कोटी रुपये मिळाले.

संजीदा शेख

संजीदाने रेहाना आणि मल्लिकाजानची धाकटी बहीण वहिदा ही भूमिका साकारली होती. तिला या सीरिजसाठी ४० लाख रुपये मानधन देण्यात आलं.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

शर्मीन सेहगल

अभिनेत्री शर्मीन सेहगल यात मल्लिकाजानच्या धाकट्या मुलीच्या भूमिकेत झळकली. तिला या वेब सीरिजसाठी ३० लाख रुपये मानधन मिळालं.

फरदीन खान

फरदीन खानने या वेब सीरिजमधून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे. त्याने यात नवाब वली बिन झायेद-अल मोहम्मद ही भूमिका साकारली आहे. यासाठी त्याला ७५ लाख रुपये मानधन देण्यात आलं.

‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार या सर्व स्टारकास्ट इतकं मानधन देण्यात आलं आहे. ‘हीरामंडी’मध्ये शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा शाह बदुशा, फरीदा जलाल आणि श्रुती शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heeramandi budget actress fees sanjay leela bhansali charges sonakshi sinha manisha koirala hrc