अभिनेता जेसन शाह संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरीजममुळे चर्चेत आला आहे. या शोमध्ये जेसनने ब्रिटिश अधिकारी कार्टराईटची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील अभिनयासाठी जेसन शाहचं खूप कौतुक होत आहे. याचदरम्यान त्याने आपल्या मराठमोळ्या एक्स गर्लफ्रेंडशी ब्रेकअप का झालं याचा खुलासा केला आहे. जेसन व्हीजे व अभिनेत्री अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आता एका मुलाखतीत जेसनने ब्रेकअपची काही कारणं सांगितली आहेत.

अनुषासोबत ब्रेकअप झाल्यामुळे आपल्यात मोठा आध्यात्मिक बदल झाला आहे, असं जेसनने सांगितलं. ब्रेकअप कशामुळे झालं याबद्दल तो म्हणाला की तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये येण्यास त्याच्याकडून घाई झाली आणि अनुषा त्याला खरोखर समजू शकली नाही. “समोरची व्यक्ती (अनुषा) मला खरोखरच समजून घेऊ शकली नाही आणि मला वाटलं की ती मला तिच्या एका ठराविक बॉक्समध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत होती. पण तसं होऊ शकत नाही ना?” असं जेसन म्हणाला.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

सैफच्या पहिल्या बायकोशी शर्मिला टागोर यांचं कसं आहे नातं? सारा अली खान खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईला…”

अनुषा व त्याचं नातं तुटण्यासाठी गैरसंवाद कारणीभूत असल्याचंही जेसनला वाटतं. “कधीकधी आपले विचार योग्य प्रकारे मांडू न शकल्यामुळेही नाती तुटतात. मला वाटतं की आमच्या बाबतीतही असंच घडलं. आम्ही एकमेकांशी नीट बोलू शकत नव्हतो आणि त्यामुळे आमच्यातील गैरसमज वाढले. मला वाटतं ती मला समजू शकली नाही आणि नंतर आम्ही वेगळे झालो,” असं जेसन म्हणाला.

जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…”

ब्रेकअपनंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वात कोणते बदल झाले, याबाबत जेसनने सांगितलं. “ब्रेकअपनंतर माझ्यात अनेक बदल झाले. माझा कल अध्यात्माकडे वाढला आहे. मी आता गोष्टी चांगल्या प्रकारे पाहू आणि समजू शकतो,” असं जेसनने सांगितलं.

‘हीरामंडी’पूर्वी, जेसनने ‘झाशी की रानी’मध्ये काम केलं होतं. याशिवाय तो ‘बिग बॉस’ मध्येही सहभागी झाला होता. काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये तो व अनुषा दांडेकर वेगळे झाले. त्यावेळी जेसन ब्रेकअपबद्दल काहीच बोलला नव्हता, मात्र आता तीन वर्षांनी त्याने अनुषापासून वेगळा का झाला, यामागच्या कारणांचा खुलासा केला.

“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

अनुषा दांडेकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अलीकडेच दोन मराठी चित्रपटांमध्ये दिसली. तिने बाप माणूस चित्रपटात काम केलं होतं, त्यात ती अभिनेता पुष्कर जोगबरोबर मुख्य भूमिकेत होती. यात केया इंगळे व शुभांगी गोखले यांनीही काम केलं होतं. त्यानंतर अनुषा महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात झळकली. यात भुषण प्रधान, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, सचिन खेडेकर हे कलाकार होते.

Story img Loader