‘हीरामंडी- द डायमंड बाजार’ फेम ताहा शाह त्याच्या ताजदार बलोचच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. ताहा शाह अभिनेत्री प्रतिभा रांता हिला डेट करीत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिभानं या वेब सीरिजमध्ये शमाची भूमिका साकारली आहे. तर, ‘लापता लेडीज’मध्येदेखील ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. ताहा शाह आणि प्रतिभाला एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिल्यानंतर या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. आता अभिनेत्यानं या अफवेवर मौन सोडलं आहे.

हेही वाचा… शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचं अपार्टमेंट; किंमत वाचून व्हाल थक्क

ताहा शाहनं नुकतीच ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ताहा शाह म्हणाला, “माझी इच्छा आहे की, मी तुम्हाला सांगू शकलो असतो की, मी प्रेमात आहे. पण, आता माझी जबाबदारी प्रेमात पडायची नाही; तर आईनं जे काही मला दिलंय, ते तिला परत करायची आहे आणि तिला अभिमान वाटावा, असं काहीतरी करायची जबाबदारी माझ्यावर आहे. आता मला लक्ष केंद्रित करायची गरज आहे. मी आता फक्त एकाच रिलेशनशिपमध्ये असू शकतो आणि ते म्हणजे माझं काम आणि त्यामुळेच मी माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. पण, हो मला प्रेमात पडायचंय आणि मला माझं कुटुंबही हवंय. या सगळ्यासाठी सर्वांत आधी मला माझ्या पायांवर उभं राहायचंय.”

जेव्हा ताहा शाहला असं विचारण्यात आलं की, ‘हीरामंडी’मधील भूमिकेसारखाच म्हणजेच ताजदार बलोचसारखाच तो लव्हर बॉय आहे का? त्यावर अभिनेता म्हणाला, “मी नेहमीच अशी व्यक्ती राहिलो आहे की, तो जर प्रेमात पडला, तर त्या मुलीसाठी काहीही करू शकतो. जेव्हा मी प्रेमात पडतो तेव्हा मी १० वर्षांचा होऊन जातो. पण मी सांगू इच्छितो की, प्रेम शोधणं हे खूप कठीण झालंय. जेव्हा मी प्रेमात पडलोय तेव्हा मी समोरच्यासाठी जे शक्य होईल ते केलंय. मी प्रेमात पडल्यानंतर खूप हट्टी असल्यासारखा वागतो. मी ९० च्या दशकातला मुलगा आहे आणि त्या वेळेला काही इंटरनेट सेवा नव्हत्या. तेव्हा माझं हस्ताक्षर खूप वाईट होतं तरीही मी प्रेमपत्र लिहायचो. मी त्या पत्रामध्ये फुलाची पाकळी ठेवायचो आणि ते पत्र बसमध्ये फेकून द्यायचो; जेणेकरून ती मुलगी ते पत्र वाचू शकेल.”

हेही वाचा… मनोज बाजपेयींनी सांगितली माजी क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या भेटीची ‘ती’ आठवण, म्हणाले, “मला खूप महत्वाची…”

दरम्यान, ताह शाहनं याआधी ‘लव्ह का द एंड’, ‘बार बार देखो’, ‘कब्जा’ अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heeramandi fame taha shah on dating pratibha ranta rumours dvr