२०१८ मध्ये एमसीयू म्हणजेच मार्व्हल सिनेमॅटीक यूनिव्हर्सचा ‘ब्लॅक पॅन्थर’ (Black Panther) हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये मध्यवर्ती पात्र असलेला ब्लॅक पॅन्थर हा सुपरहिरो मार्व्हल कॉमिक्समधला पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता चॅडविक बोसमनने (Chadwick Boseman) प्रमुख भूमिका साकारली होती. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे तोंड भरुन कौतुक केले होते. या चित्रपटामुळे पाश्चिमात्य देशामध्ये राहणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांना प्रेरणा मिळाली होती.
आता याच चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाचा पुढील भाग ब्लॅक पॅन्थर २/ ब्लॅक पॅन्थर वंकाडा फॉरेव्हर’ (Black Panther: Wakanda Forever) हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न होता आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २० जानेवारीपासून डिस्ने प्लस हॉटस्टार भारतात ‘ब्लॅक पँथर २ वाकांडा फॉरएव्हर स्ट्रीमिंग’ चे सुरू होईल. हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
रायन कूगलरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चॅडविक बोसमनचा सन्मान करतो ज्याने मूळ ब्लॅक पँथरमध्ये काम केले होते. मात्र २०२० साली कर्करोगाने चॅडविक बोसमनचे निधन झाले. या चित्रपटात लेटिया राइट शुरीची भूमिका करत आहे, त्याचबरोबरीने लुपिता न्योंग’ओ नाकियाची भूमिका करत आहे, दानाई गुरिरा ओकोयेची भूमिका करत आहे, विन्स्टन ड्यूक एम’बाकूची भूमिका करत आहे, डॉमिनिक थॉर्न आयरनहार्टची भूमिका करत आहे. टेनोच ह्युर्टा नामोरची भूमिका करत आहे, मार्टिन फ्रीमन एव्हरेट के. रॉस, अँजेला बॅसेट राणी रॅमोंडाची भूमिका करत आहे.