Horror Movies on Prime Video: कॉमेडी, फॅमिली ड्रामा चित्रपटांचे खूप चाहते असतात; पण लोक सहसा भयपट पाहायला घाबरतात. काही धाडसी लोकांना भयपट पाहायला आवडतात. जर तुम्ही देखील त्याच धाडसी लोकांपैकी एक असाल तर आज आम्ही तुम्हाला काही भयंकर चित्रपटांची नावं सांगणार आहोत. यामध्ये हॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीचा समावेश आहे. पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर चुकूनही एकटे असताना हे चित्रपट पाहू नका. यातील चौथा चित्रपट घाबरणाऱ्या लोकांसाठी अजिबात नाही, त्यामुळे एकटं पाहण्याची रिस्क घेऊ नका.
ब्राइड ऑफ चकी
Bride of Chucky on OTT : हा चित्रपट खूपच भयंकर आहे, ज्यामध्ये एक क्युट बाहुली दुष्ट बाहुली होते. या चित्रपटात एका सिरीयल किलरच्या आत्म्याची कथा दाखवण्यात आली आहे. तो किलर चकी नावाच्या बाहुलीमध्ये प्रवेश करतो आणि लोकांना घाबरवतो आणि त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आणतो. हा भयपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
राज
Raaz movie on OTT: २००२ मध्ये रिलीज झालेला बिपाशा बसूचा हा चित्रपट खूपच भीतीदायक आहे. ज्यांना भयपट पाहायला आवडतात, ते हा चित्रपट पाहू शकतात. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
तुंबाड
Tumbbad on OTT : राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा सर्वात गाजलेल्या भयपटांपैकी एक आहे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता, तेव्हा त्याने मूळ कलेक्शनपेक्षा जास्त कमाई केली होती. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
द नन
The Nun on OTT : हा चित्रपट खूप भयानक आहे जो तुमच्या मनावर खोल प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हॉरर चित्रपट आवडत नसतील किंवा भीती वाटत असेल तर चुकूनही पाहू नका. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ व जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.
परी
Pari on OTT: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘परी’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट फारसा लोकांना आवडला नव्हता, पण या चित्रपटाची कथा पाहून तुम्हाला अंगावर शहारे येतील. हा चित्रपट तुम्हाला प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.