अनेकांना हॉरर व थ्रिलर चित्रपट पाहायला खूप आवडतात, अशाच चाहत्यांसाठी आम्ही एका चित्रपटाबद्दल माहिती आणली आहे. १९९९ मध्ये एक हॉरर थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. इतकंच नाही तर या सिनेमाला आयएमडीबीवरही चांगलं रेटिंग मिळालं होतं.

आम्ही राम गोपाल वर्मा यांच्या ‘कौन’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटात फक्त तीन कलाकार होते. उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंह. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटाचं शूटिंग अवघ्या १५ दिवसांत पूर्ण झालं होतं. या चित्रपटासाठी राम गोपाल वर्मा यांनी केवळ दोन कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटातील आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे उर्मिला मातोंडकरचं नावच या चित्रपटात कळत नाही. यात तिला फक्त मॅडम म्हणण्यात आलं आहे. या चित्रपटाला तेलुगुमध्ये ‘येवारू’ नावाने डब करण्यात आलं होतं. तर कन्नडमध्ये ‘शॉक’ नावाने या चित्रपटाचा रिमेक करण्यात आला होता.

asha negi talks on ritvik dhanjani and her break uo
६ वर्षांचं रिलेशनशिप अन् ४ वर्षांपूर्वी ब्रेकअप; चाहते अजूनही करतात ट्रोल, अभिनेत्री म्हणाली, “सिंगल असल्यावर…”
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Black Friday movie controversy (1)
“मला वाटलं भारत सरकार प्रिंट जाळेल”, घाबरलेल्या अनुराग कश्यपने परदेशात नेलेल्या ‘या’ बंदी घातलेल्या सिनेमाच्या DVD
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Mukkam post Bombilwadi marathi drama
‘मु. पो. बोंबिलवाडी’ रुपेरी पडद्यावर, २४ वर्षांनंतर गाजलेल्या नाटकाचे माध्यमांतर
png jewellers ipo analysis
पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त शेवटच्या दिवशी ५९.४१ पट भरणा

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

‘कौन’ चित्रपटाला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग

‘कौन?’ चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. या चित्रपटाची कथा अनुराग कश्यपने लिहिली आहे. ‘कौन’ चित्रपट प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली आहेत, पण आजही जेव्हा हॉरर-थ्रिलर चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून होतो. हा चित्रपट फक्त प्रेक्षकांनाच नाही तर समीक्षकांनाही आवडला होता. या चित्रपटाला IMDb वर १० पैकी ७.८ रेटिंग मिळाले होते.

नताशाचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनीची संपत्ती किती? हार्दिक पंड्याच्या तुलनेत अभिनेता फक्त ‘इतक्या’ कोटींचा मालक

‘कौन’ चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटाची कथा तुरुंगातून पळून गेलेल्या एका खुन्यापासून सुरू होते. मॅमच्या (उर्मिला मातोंडकर) घराच्या दारावर थाप पडते आणि तिला तिथे अनोळखी लोक उभे दिसतात. हे दोघे म्हणजे म्हणजे मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंह होय. ही माणसं कोण आहेत? त्यापैकी कोणी खुनी आहे का, जर एक खूनी असेल तर दुसरा कोण? या सर्व प्रश्नांभोवती हा चित्रपट फिरतो. हा चित्रपट खूपच मनोरंजक आहे. हा सिनेमा रिलीज होऊन अडीच दशकं उलटली तरी जो थ्रिलर-हॉरर सिनेमे आवडणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. खासकरून उर्मिला मातोंडकरची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.

“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आपल्या आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

कुठे पाहता येणार चित्रपट?

हॉरर-थ्रिलर चित्रपट ‘कौन’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ५.६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.