Horror Thriller Movies On Netflix: कॉमेडी आणि ॲक्शनबरोबर आता लोकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची प्रचंड क्रेझ आहे. जर तुम्हालाही हॉरर चित्रपट आणि वेब सीरिज पाहणं आवडत असेल, तर आम्ही तुम्हाला काही उत्कृष्ट हॉरर चित्रपटांबद्दल सांगत आहोत, जे पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडेल. एवढंच नाही तर या कलाकृती एकटे असताना पाहिल्यानंतर तुमची रात्रीची झोपही उडू शकते. हे भयपट पाहून तुम्हाला तुमच्या सावलीचीही भीती वाटू शकते. नेटफ्लिक्सवरील अशाच काही भयपटांची यादी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंडर द शॅडो

Under The Shadow on Netflix: २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘अंडर द शॅडो’ हा चित्रपट सर्वोत्तम हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षकांना त्याची कथा खूप आवडली होती. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास याची कथा आई आणि मुलीभोवती फिरते. त्याचबरोबर या चित्रपटात दोन देशांमधील युद्ध पाहायला मिळते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.८ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

सिस्टर डेथ

Sister Death on Netflix : २०२३ साली प्रदर्शित झालेला ‘सिस्टर डेथ’ हा एक हॉरर मिस्ट्री चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात तुम्हाला भीती वाटू शकते. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झाल्यास हा चित्रपट चर्चमधील सिस्टर्सवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन पॅको प्लाझा यांनी केलं आहे. आयएमडीबीवर याला ५.७ रेटिंग मिळाले असून हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर घरबसल्या पाहू शकता.

डे शिफ्ट

Day Shift on Netflix : ‘डे शिफ्ट’ हा जेजे पेरी दिग्दर्शित २०२२ मध्ये रिलीज झालेला एक हॉरर ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात जेमी फॉक्सची भूमिका आहे. या चित्रपटाच्या कथेत बापलेकीला स्विमिंग पूलमध्ये आलेले भयानक अनुभव दाखवले आहेत. हे पाहून तुम्हालाही भीती वाटेल. आयएमडीबीवर या चित्रपटाला ६.१ रेटिंग मिळाले आहे.

द अनइनव्हायटेड

The Uninvited on OTT : ‘द अनइनव्हायटेड’ हा २००९ मध्ये रिलीज झालेला एक हॉरर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात एक मुलगी खूप दिवसांनी मेंटल हॉस्पिटलमधून घरी येते आणि त्यानंतर तिच्यासोबत अनेक भयानक गोष्टी घडतात, ज्या पाहून तुम्हाला भीती वाटू शकते. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या या चित्रपटाला IMDb वर ६.३ रेटिंग मिळाले आहे.

द कॉन्फरन्स

The Conference on Netflix : ‘द कॉन्फरन्स’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. त्याची कथा एका निर्जन जंगलाभोवती फिरते, जे खूपच धोकादायक आहे. १ तास ४० मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला हादरवून सोडेल. ५.७ रेटिंग असलेला हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता.