School Of Lies Review : ज्या वेबसीरिजच्या नावातच खोट आहे, त्या वेब सीरिजकडून दर्जेदार कंटेंटची अपेक्षा करणंच व्यर्थ आहे. ‘स्कूल ऑफ लाइज’ (School of lies) नावाची एक वेब सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे. खरंतर वेब सीरिजमधून खूप संवेदनशील आणि वादग्रस्त अशा मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे पण कथानकाची हाताळणी ज्या पद्धतीने केली आहे ते पाहता ही वेब सीरिज आपल्या देशातील बहुतांश लोकांना आपलीशी वाटणारच नाही. मुळात या सीरिजमध्ये दाखवलेल्या शाळा खरंच अस्तित्त्वात आहेत का? यापेक्षा करण जोहरच्या चित्रपटातील शाळा परवडल्या. किमान त्याचे चित्रपट प्रेक्षकांना टॉर्चर करण्यापेक्षा त्यांचं मनोरंजन तरी करतात, पण या अशा वेब सीरिजमधून केवळ आपल्याला मनस्तापच मिळतो.

सीरिजची कथा मोठ्या बोर्डिंग स्कूलमधील एका मुलाच्या गायब होण्यापासून सुरू होते. आता तो नेमका मुलगा का गायब झाला आहे, त्यात या शाळेतील सिनीयर्सचा हात आहे का? तो नेमका गायब झाला आहे, त्याचं अपहरण झालं आहे की आणखी काही? या सगळ्या गोष्टींबरोबरच शाळेतील वेगवेगळी रहस्यं आपल्यासमोर उलगडायला सुरू होतात. या मिस्ट्री थ्रिलरबरोबर वेब सीरिजमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि बलात्कार याबद्दलही भाष्य करण्यात आलं आहे. ही कथा सहज दोन ते अडीच तासाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडता आली असती, पण उगाच ती खेचून त्याची वेब सीरिज करण्याचा दिग्दर्शक अविनाश अरुण यांचा अट्टहास समजण्यापलीकडचा आहे.

Cardiac Arrest
Cardiac Arrest : तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! कर्नाटकनंतर गुजरातमध्येही समोर आला धक्कादायक प्रकार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
pune dance teacher sexually assaulted minors at school in Karvenagar
नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
Two children in Nagpur infected with HMPV news
नागपुरात दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’? गडचिरोलीत चार संशयित रुग्ण, नमुने तपासणीसाठी ‘एम्स’मध्ये
Financial fraud , students , educational institution,
ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा

आणखी वाचा : Bandaa Movie Review : कथित संतांच्या कुकर्मावर भाष्य करणारा, मनोज बाजपेयींचा ‘बंदा’ नेमका कसा आहे? जाणून घ्या

कथेत पटकथेत काहीच वेगळं नसल्याने ही सीरिज उगाच काहीतरी नवं दाखवल्याचा आव आणते असंच सतत वाटत राहतं. शिवाय लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि खासकरून POCSO Act (protect children from sexual assault, sexual harassment and pornography) सारखे गंभीर मुद्दे अगदी बालिशपणे सीरिजमध्ये मांडण्यात आले आहेत. पालकांनी मुलांना आपल्यापासून दूर ठेवल्यावर त्यांच्या मानसिकतेमध्ये कसे बदल होतात, ते कुटुंबापासून कसे तोडले जातात आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या ही या वेब सीरिजची एकूण कथा जरी असली तरी त्यातून म्हणावं तसं समाधानकारक उत्तर हाती लागत नाही. उलट या सगळ्या समस्यांचा उपयोग करून खुनासारख्या गुन्ह्याला ग्लॅमराईज करण्याचा फुटकळ प्रयत्न ही वेब सीरिज करते.

नुकतंच POCSO सारख्या गंभीर विषयावर मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यासमोर ही वेब सीरिज खरंच फारच बालिश वाटते. सीरिजमधील लहान मुलांची पात्रं ही त्यांच्या वयाच्या मानाने फारच मच्युअर दाखवली असल्याने आपण त्यांच्याशी जोडलो जातच नाही. याबरोबरच सीरिजमधील संवाद हे अर्धेअधिक इंग्रजीत असल्याने या वेब सीरिजला हिंदी का म्हणावं हा प्रश्न राहतो. सगळे संवाद अत्यंत रटाळ, आणि प्रत्येक सीन उगाच ताणल्याने ही वेब सीरिज पाहण्यात काहीच रस उरत नाही.

आजकाल सत्य घटनांवरुन प्रेरित असं कुठल्याही चित्रपट किंवा वेब सीरिजआधी लिहिलं की लोक ते आवडीने बघतात हा गैरसमज कधी दूर होणार कोणास ठाऊक? केवळ वेब सीरिजचं सादरीकरण, लोकेशन्स, पार्श्वसंगीत चांगलं असल्याने आपल्याला ही सीरिज थोडी बघावी म्हणून वाटू शकते. लहान मुलांची खासकरून किशोरवयीन मुलांची मनस्थिति, त्यांचे होणारे लैंगिक शोषण यासारखा गंभीर विषय असूनही त्याचा संबंध एक खुनाशी जोडल्याने संपूर्ण सीरिजचा फोलपणा बाहेर येतो. कलाकारांची कामंदेखील ठीक आहेत, आमिर बशीर आणि निम्रत कौरसारखे कलाकार असूनही ही सीरिज प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरते. सोनाली कुलकर्णी आणि जितेंद्र जोशीसारखे कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांची कामंही यथातथाच झाली आहेत. एकंदरच अत्यंत रटाळ, कंटाळवाणी आणि गंभीर मुद्द्याला हात घालून काहीतरी भलतीच गोष्ट लोकांसमोर मांडत लोकांना जागरूक करण्याचा आव आणणारी ‘स्कूल ऑफ लाईज’ ही वेब सीरिज हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ज्यांना हे असं कथानक बघायला आवडतं ते लोक ही सीरिज पाहू शकतात, पण जरी ही वेब सीरिज पाहिली नाही तरी फारसं काही बिघडणार नाही हे मात्र नक्की.

Story img Loader