Love Story Movies On OTT: करोनानंतर ओटीटी हे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम झालं आहे. काही चित्रपट फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज केले जातात. तर काही चित्रपट आधी थिएटरमध्ये आणि नंतर ओटीटीवर प्रदर्शित होतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट व वेब सीरिज पाहता येतात.
ओटीटीवर तुम्हाला फक्त क्राइम-थ्रिलरच नाही तर अनेक रोमँटिक चित्रपट पाहायला मिळतात. ज्यात प्रेम, भावना, संघर्ष, ब्रेकअप व ऋणानुबंध उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. तुम्हाला ‘सनम तेरी कसम’ व ‘लैला मजनू’ सारखे चित्रपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीव उपलब्ध हे तीन चित्रपट नक्की पाहा. या चित्रपटाचे क्लायमॅक्स पाहून तुम्हाला धक्का बसेल.
हृदयम
Hridayam on OTT : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘हृदयम’ अनेकांना आवडला होता. प्रणव मोहनलाल, कल्याणी प्रियदर्शन आणि दर्शना राजेंद्रन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट विनीत श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केला आहे. यात अरुण नीलकंदन (प्रणव मोहनलाल) नावाचा मुलगा चेन्नईला इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी येतो आणि तेथील सर्वात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो.
कॉलेजमध्ये तो दर्शना (दर्शना राजेंद्रन) नावाच्या मुलीच्या पहिल्या नजरेत प्रेमात पडतो. पण, नंतर काहीतरी घडतं, ज्यामुळे त्यांचं ब्रेकअप होतं आणि इथेच कहाणीत ट्विस्ट येतो. या सिनेमाचा क्लायमॅक्स खूप चांगला आहे. चित्रपटाला आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टावर उपलब्ध आहेत, तसेच तो तुम्हाला यूट्यूबवर मोफत पाहता येईल.
दिया
Dia on OTT : २०२० मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट ‘दिया’ हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. यात पृथ्वी अंबर, दीक्षित शेट्टी, कुशी आणि पवित्रा लोकेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा खूपच भावुक आहे. यात दिया नावाच्या एका तरुणीची कहाणी दाखवण्यात आली आहे. दिया अंतर्मुख असते, पण ती तिच्या कॉलेजमधील एका मुलाच्या प्रेमात पडते आणि तिचं आयुष्य बदलतं.
अंतर्मुख असल्याने दिया तिचं प्रेम व्यक्त करू शकत नाही आणि हेच तिच्या आयुष्यातील मोठं आव्हान ठरतं. या चित्रपटाचा शेवट पाहून तुम्ही हादरून जाल. आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळालेला हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. तसेच तो युट्यूबवरही उपलब्ध आहे.
थ्री ऑफ अस
Three Of Us on Netflix : ‘थ्री ऑफ अस’ २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात जयदीप अहलावत, शेफाली शाह, स्वानंद किरकिरे यांनी तीन महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात शेफाली शाहने जे पात्र साकारलं आहे तिला स्मृतीभ्रंशची समस्या असते. पूर्णपणे स्मृतीभ्रंश होण्याआधी तिला तिच्या कोकणातील गावात जाऊन काही दिवस राहायचं असतं. तिथे तिला तिच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जगायच्या असतात. तसेच बालपणी ज्याच्यावर तिचं प्रेम असतं, त्याला भेटायचं असतं.
ती पतीबरोबर गावी जाते, तिथे गेल्यानंतर काय घडतं, हा भावनिक प्रवास तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले आहे.