बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये हुमा कुरेशीच्या नावाचाही समावेश आहे. नुकताच ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर सोनाक्षी सिन्हादेखील होती. बॉडी शेमिंगवर या चित्रपटात भाष्य केले होते. यानंतर तिचा ‘मोना डार्लिंग’ चित्रपटदेखील नेटफ्लिसवर प्रदर्शित झाला आहे. हुमा ओटीटीवरदेखील सक्रीय आहे. तिची ‘महाराणी’ ही वेबसीरीज चांगली गाजली आहे. यातील तिची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेबद्दल तिने आजतकशी बोलताना खुलासा केला.
हुमाने सांगितले की, ‘महाराणी’ करण्यापूर्वी टीमने तिला सांगितले होते की, हे तिच्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकते. अनेकांनी हुमाला समजावून सांगितले की, पडद्यावर तीन मुलांची आई बनल्याने तिची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते. अभिनेत्रीच्या टीमनुसार, ही भूमिका तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीची होती. त्यानंतर सर्वांनी हुमाला दिग्दर्शकाशी बोलण्याचा सल्ला दिला.
राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी की अरविंद केजरीवाल; ‘हा’ आहे नवाझुद्दीन सिद्दीकीचा आवडता नेता
बिहारच्या राजकारणाची पार्श्वभूमी वापरून ‘महाराणी’ या वेबसीरिजची कथा लिहण्यात आली होती. या वेबसीरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. सोहम शाह, अमित सियाल, प्रमोद पाठक, कानी कुसरुती, इनाममुलहक आदी कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. मूळची दिल्लीची असून, नाटकांमधून तिने काम करण्यास सुरवात केली. अभिनयनात करियर करण्यासाठी तिने २००८ साली मुंबई गाठली. तिचे वडील हॉटेल व्यवसायात असून तिचा भाऊ साकिब सलीमदेखील अभिनय क्षेत्रात आहेत.