Crime Thriller Movies On OTT: सध्या ओटीटीवर क्राइम-थ्रिलर चित्रपट व सीरिज पाहण्याची क्रेझ लोकांमध्ये दिसून येते. प्रेक्षकांना क्राइम-थ्रिलर कलाकृती आवडत असल्याने त्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. अशाच काही कलाकृतींबद्दल जाणून घेऊयात.
विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेल्या ५ सर्वोत्तम चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात. हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं डोकं चक्रावेल. या सिनेमांचा सस्पेन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. या चित्रपटांना आयएमडीबीवर उत्तम रेटिंग मिळालं आहे.
जोसेफ
Joseph on OTT : ‘जोसेफ’ हा थ्रिलर चित्रपट आहे, जो २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जोजू जॉर्जने महत्त्वाची भूमिका केली आहे. हा सिनेमा एका निवृत्त पोलिसावर आधारित आहे जो एका प्रकरणात अडकतो. एकदा तुम्ही हा चित्रपट पाहण्यास सुरुवात केली की, तो तुम्हाा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. याला IMDb वर ८ रेटिंग मिळाले असून तो प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
विलेन
Villain on OTT : २०१७ मध्ये रिलीज झालेला ‘विलेन’ हा मल्याळम क्राईम-ॲक्शन चित्रपट आहे. मोहनलाल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच राशी खन्ना, हंसिका मोटवानी यांच्यासह अनेक स्टार्स यात आहेत. चित्रपटाची कथा एडीजीपी मॅथ्यू मंजूरन यांच्याभोवती फिरते, जे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. ते काही काळ सुट्टी घेतल्यानंतर राजीनामा देतात. पण एका प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना पुन्हा नोकरीवर बोलावलं जातं. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.१ टक्का रेटिंग मिळाले असून तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
मुंबई पोलीस
Mumbai Police on OTT: मुंबई पोलीस हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, जो २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. रोशन एंड्रयूज दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनने काम केले होते आणि सिनेमा लोकांना खूप आवडला होता. याला IMDb वर ७.९ रेटिंग मिळाले आहे आणि तो तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
कोल्ड केस
Cold Case on OTT : ‘कोल्ड केस’ हा एक हॉरर, थ्रिलर आणि खून रहस्यपट आहे. यात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात एका मच्छिमाराला मृत व्यक्तीची कवटी सापडते, तपासणी केल्यानंतर असं समजतं की कवटीचा सांगाडा २५ ते ३० वर्षे वयाच्या इवा मारिया नावाच्या मुलीचा आहे. प्रकरणाचा तपास सुरू होतो आणि शेवटी धक्कादायक सत्य समोर येतं. आयएमडीबीवर ६.१ रेटिंग असलेला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
आयडेंटिटी
Identity on OTT: टोविनो थॉमस आणि त्रिशा कृष्णन यांचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘आयडेंटिटी’ यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या सिनेमाची कथा आणि सस्पेन्स तुमचं मन जिंकेल. या चित्रपटाला IMDb वर ७.४ रेटिंग मिळाले आहे. तुम्ही तो ZEE5 वर पाहू शकता.