नेटफ्लिक्सवरील शो ‘इंडियन मॅचमेकिंग’मध्ये मुंबईतील ज्वेलरी डिझायनर प्रद्युम्न मालू झळकला होता. त्याच्या जोडीदाराकडून खूप अपेक्षा होत्या. त्याला लग्नासाठी १५० तरुणींचे प्रोफाईल दाखविण्यात आले होते. पण त्याला हवी तशी मुलगी मिळाली नाही. त्यानंतर शोच्या बाहेर तो आशिमा चौधरीला भेटला आणि त्यांनी २०२०मध्ये लग्न केलं. त्यांच्या नात्याची घोषणा करण्यासाठी तो सीझन २ मध्ये देखील दिसला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार, आशिमाने प्रद्युम्नवर शारीरिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांद्रयानाची खिल्ली उडवणाऱ्या प्रकाश राज यांचं Chandrayaan 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर ट्वीट; नेटकरी म्हणाले, “लाज वाटते की…”

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, अशिमाचे वकील अनमोल बार्टरिया म्हणाले, “एफआयआरमध्ये दाखल केलेले आरोप गंभीर आहेत. त्यात घरगुती हिंसाचार. सतत मानसिक व शारीरिक शोषण झाल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आशिमा कायद्यानुसार आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आहे.”

मंजिरी कॅनडात राहायची, मग तुमचं कसं जमलं? सुबोध भावे म्हणाला, “एक्स्पोर्ट क्वालिटीचा माल असतो, जो आपल्याला…”

दरम्यान याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं प्रद्युम्नने सांगितलं आहे. “मला याबद्दल माहिती नाही. माझ्या माहितीनुसार आम्ही आमच्या समस्यांचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी वकिलांशी चर्चा करत आहोत,” असं तो म्हणाला. मॅचमेकर सिमा टापारियाने शोमध्ये त्याची मॉडेल रुशाली रायशी ओळख करून दिली होती. पण ते दोघेही लग्नापर्यंत पुढे जाऊ शकले नाही. एफआयआरबद्दल रुशालीची प्रतिक्रियाही आली आहे. “तो तसा (शोषण करणारा) वाटत नाही. त्यांचं ब्रेकअप होत असल्याचं मी ऐकलं होतं. पण घरगुती हिंसाचाराबद्दल मला माहिती नाही. जेवढं मी त्याला ओळखतो, त्यानुसार हे खरं असू शकत नाही,” असं रुशाली म्हणाली.

प्रद्युम्न मालूची पत्नी आशिमा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती ‘एमटीव्ही लव्ह स्कूल’ आणि ‘एस ऑफ स्पेस’ सारख्या शोमध्ये दिसली होती.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian matchmaking contestant pradhyuman maloo once rejected 150 women now his wife ashima chauhaan files fir hrc