एकीकडे टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा १६ वा सीझन संपला आणि दुसरीकडे कंगना रणौत होस्ट करत असलेल्या ‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पहिला सीझन सुपरहिट झाल्यानंतर आता कंगना रणौत दुसऱ्या सीझनची तयारी करत असल्याचं बोललं जात असून या शोसाठी बिग बॉस १६ मधील स्पर्धकांची नावं चर्चेत आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंगना रणौत होस्ट करत असलेल्या ‘लॉक अप’ शोला मागच्या वर्षी खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या शोचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याच्या चर्चा असून त्यात बिग बॉस १६ चे काही धमाकेदार सदस्यही दिसणार असल्याचं बोललं जातं आहे. लॉकअपच्या दुसऱ्या सीझनसाठी बिग बॉस स्पर्धक अर्चना गौतमला ऑफर मिळाल्याचं बोललं जातं होतं. त्यानंतर आता या शोसाठी बिग बॉस १६ रनरअप शिव ठाकरेचं नावही चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा- “तो खेळला असता तर…”, एमसी स्टॅनवर टीका करणाऱ्यांना शिव ठाकरेचं उत्तर

बिग बॉस १६ मध्ये शिव ठाकरेने त्याची दमदार खेळी आणि चांगल्या वागणूकीने सर्वांची मनं जिंकली होती. त्यानंतर शिव ठाकरेला रोहित शेट्टीचा रिअलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर मिळाल्याचं बोललं जात आहे. पण त्याच बरोबर कंगनाच्या ‘लॉक अप’ शोसाठीही त्याला विचारणा झाल्याची चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा- एमसी स्टॅनबद्दल उर्फी जावेद बोलली असं काही; ट्रोल करत नेटकरी म्हणाले, “ही खरी शेमडी…”

दरम्यान ‘लॉक अप’ शोसाठी शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्या व्यतिरिक्त सौंदर्या शर्माचं नावही चर्चेत आहे. बिग बॉस १६ चे हे तीनही सदस्य कंगना रणौत होस्ट करत असलेल्या शोमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. यावेळी हा शो फक्त ओटीटीवर नाही तर टीव्हीवरही टेलिकास्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. शिव ठाकरेचं नाव समोर आल्यापासून या शोबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसत आहे.