टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व चांगलेच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात आलिया सिद्दीकी, मनीषा रानी, जैद हदीद, पूजा भट्ट आणि आकांक्षा पुरी हे स्पर्धक आहे. लोकांना मनीषा आणि जैदची केमिस्ट्री आवडू लागली आहे. अशातच मॉडेल जैद हदीदने त्याच्या आयुष्याशी संबंधित काही खुलासे केले आहेत. जैदची कहाणी ऐकून पूजा भट्टला अश्रू अनावर झाले.

पूजा भट्टचे लग्न का मोडले? मुलं का झाली नाहीत? अभिनेत्रीने पूर्वाश्रमीच्या पतीबाबत ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये केले खुलासे

‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये जैद हदीदने त्याच्या बालपणीचा संघर्ष उघड केला. आज ऐशोआरामात जगणाऱ्या जैदरने बालपणी कचऱ्याच्या डब्यात फेकलेलं अन्न खाल्लं आहे. त्याने ही गोष्ट पूजा भट्ट आणि सायरस ब्रोचासोबत शेअर केली आहे. “माझी आई गरोदर राहिली आणि त्यानंतर माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईची प्रकृती चांगली राहत नव्हती. माझे वडील कुठेतरी निघून गेले होते. माझा जन्म झाला तेव्हा ते आमच्यासोबत नव्हते. ते आता परत येणार नाही असं माझ्या आईला वाटलं. ही १९८४ ची गोष्ट आहे, तेव्हा फोनही नव्हते,” असं तो म्हणाला.

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

जैद पुढे सांगतो, “एक दिवस अचानक माझे वडील आले आणि आईला घटस्फोट दिला. मग आईनेही मला शेजाऱ्यांच्या दाराबाहेर सोडलं, तिची बॅग भरली आणि आई-वडिलांच्या घरी निघून गेली. ती सुपरमार्केटला जात असल्याचं तिने मला सांगितलं होतं.१७ वर्षांनंतर जेव्हा ती मला भेटली तेव्हा तिने मला हे सर्व सांगितलं. आठवडाभर जिथे आईने सोडलं होतं, तिथेच मी राहिलो. तिथल्या डस्टबिनमध्ये जवळच्या रेस्टॉरंटमध्ये उरलेले अन्न टाकायचे, तेच मी खायचो. एके दिवशी एक शेजारी आले, त्यांची लायब्ररी होती, त्यांनी मला घरी नेलं. त्यांनी दार ठोठावले पण कोणीच उघडले नाही. काही काळापूर्वी ते विकल्याचे आम्हाला समजले.”

पूजा भट्टने जैदला तो १७ वर्षांनी त्याच्या आईला कसा भेटला याबाबत विचारलं. तो म्हणाला, “मी तिला शोधलं. मी तिला सर्व काही सांगितल्यावर कागदपत्रे दाखवली आणि तिची खात्री पटली. मी तिला भेटल्यानंतर काही काळातच तिचे निधन झाले. तिने माफी मागावी असं मला कधीच वाटलं नाही. तरी तिने मला सॉरी म्हटलं होतं. तिला वाटलं की मी माझ्या वडिलांसोबत राहायचो, पण तसं नव्हतं,” असं जैदने सांगितलं.

सायरस जैदला त्याच्या वडिलांबद्दल विचारलं. तेव्हा जैदने सांगितलं की त्याच्या वडिलांचं १० वर्षांपूर्वी निधन झालं. त्याने वडिलांना शोधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जैदचे बोलणे ऐकून पूजा भट्ट खूप भावुक होते, त्याला मिठी मारून रडू लागते. तसेच मेहनत करून त्याने स्वतःचं करिअर घडवलं, त्यासाठी कौतुकही करते.