जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. जगभरात या चित्रपटाने २.३२ बिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १९ हजार कोटी रुपयांचे कमाई केली. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांना छोट्या स्क्रीनवर पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ गेल्या सहा महिन्यांपासून या चित्रपटाचे ओटीटी प्रदर्शन पुढे ढकलत होते. आजकाल चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर दोनच महिन्यांनी OTT वर चित्रपट येण्याचा ट्रेंड आहे तरी डिज्नीने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करायला एवढा वेळ का घेतला यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

आणखी वाचा : ‘RRR’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’सारख्या चित्रपटांच्या निर्मात्यांवर ईडीची धाड; ‘हे’ आहे छापेमारीमागील कारण

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ पुढील महिन्यात ७ जून रोजी ‘हॉटस्टार’ वर प्रदर्शित होत आहे. OTT वर हा चित्रपट पाहण्यासाठी, तुमच्याकडे या प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे. हा चित्रपट HD मध्ये पाहण्यासाठी तुम्हाला ८९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन आवश्यक आहे, आणि जर तुम्हाला हा चित्रपट 4K मध्ये पाहायचा असल्यास १४९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन तुमच्याकडे असायला हवा.

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ नंतर ही फ्रँचायझी पुढे नेणार असल्याचे जेम्स कॅमेरून यांनी आधीच जाहीर केले होए. २००९ साली आलेल्या ‘अवतार’नंतरच याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. ‘अवतार’चे आणखीन ३ भाग येणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे २ भाग २०२६ आणि २०२८ या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.