ओटीटी हे लोकांच्या मनोरंजनाचं मुख्य साधन बनलं आहे. जगभरातील टीव्ही शो, चित्रपट व वेब सीरिज ओटीटीवर घरबसल्या पाहता येतात. दर आठवड्याला किंबहुना दररोज ओटीटीवर कोणत्या ना कोणत्या नवीन कलाकृती येत असतात. ओटीटीचं जग खूप मोठं आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी पर्यायही खूप आहेत. आता मागच्या आठवड्यात कोणत्या वेब सीरिज प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिल्या, कोणत्या सीरिजला मागच्या आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज मिळाले, त्या टॉप पाच सीरिजबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड

‘बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड’ ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या सीरिजला गेल्या आठवड्यात ४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, असं वृत्त ‘फिल्म कम्पॅनियन’ने दिलं आहे.

मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!

द ग्रेट इंडियन कपिल शो

कपिल शर्माचा कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला ट्रेंड करत असतो. गेल्या आठवड्याच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि फराह खान या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. या शोला नेटफ्लिक्सवर खूप चांगले व्ह्यूज मिळाले. हा शो ३.४ मिलियन लोकांनी पाहिला.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

बालवीर ४

सुपरनॅचरल पॉवर्सवर आधारित ‘बालवीर’ हा शो लहान मुलांसह तरुणांनाही खूप आवडतो. या शोचा चौथा सीझन आला आहे आणि सोनी लिव्हवर तो प्रेक्षकांना पाहता येतोय. गेल्या आठवड्यात ‘बालवीर ४’ खूप लोकांनी पाहिला, या शोला मागच्या एका आठवड्यात २.१ मिलियन व्ह्यूज मिळाले.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

जमनापार

रित्विक साहोरे आणि वरुण बडोला यांची ‘जमनापर’ सीरिजही खूप चर्चेत आहे. या सीरिजलाही लोक पसंत करत आहेत. ही सीरिज अमेझॉन मिनी टीव्हीवर उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यात १.९ मिलियन लोकांनी ही सीरिज पाहिली आहे. या सीरिजमध्ये एका सीए तरुणाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या आईला पाहिलंत का? आमदार प्रणिती शिंदेंच्या बहीण आहेत मराठमोळ्या स्मृती पहारिया

हीरामंडी

संजय लीला भन्साळी यांनी ‘हीरामंडी’ या सीरिजचं दिग्दर्शन करून ओटीटीवर पदार्पण केलं. ही सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. प्रदर्शित झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांनी ही सीरिज चर्चेत आहे. आठ एपिसोड्सची ही सीरिज प्रत्येक आठवड्यात टॉप वॉच्ड लिस्टमध्ये आहे.

गेल्या आठवड्यात ‘हीरामंडी’ ला 1.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, रिचा चड्ढा, शेखर सुमन, फरदीन खान अशी तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamnapaar heeramandi baalveer 4 the great indian kapil show most viewed web series on ott hrc