अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘बवाल’मुळे चर्चेत आहेत. ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार असून नुकताच ‘बवाल’चा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये शाहरुख खान दिसणार खास भूमिकेत? चाहत्याला उत्तर देत करण जोहर म्हणाला, “३ कॅमिओ…”

चित्रपटात जान्हवी कपूरने ‘निशा’, तर वरुण धवनने ‘अजय’ ही भूमिका साकारली आहे. ‘बवाल’मध्ये अजय-निशाची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. मात्र, या गोड प्रेमकहाणीत एक थरारक ट्विस्ट येणार असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. १ मिनिट २५ सेकंदाच्या टीझरमध्ये सुरुवातीला अजय निशाला इम्प्रेस करताना दाखवण्यात आले आहे. त्यानंतर पुढे जान्हवी कपूरचे बॅकग्राऊंडमधील वाक्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. यामध्ये ती म्हणते, “या नात्याला समजून घ्यायला मी एवढा वेळ लावला की, आता सर्व संपत चाललंय…” यानंतरच्या एका सीनमध्ये जान्हवी वरुणला कानाखाली मारत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : केदार शिंदेंचे ७ अंकाबरोबर आहे खास कनेक्शन; ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर खुलासा करत म्हणाले…

टीझरमधील शेवटचा सीन प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतो. बवालच्या टीझरमध्ये सुरुवातीला गोड वाटणारी ही प्रेमकहाणी एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचते. शेवटी दोघेही एका चेंबरमध्ये विचित्र लोकांबरोबर अडकलेले दिसतात आणि एकमेकांना मोठ-मोठ्याने आवाज देत असतात. संपूर्ण टीझरमध्ये अरिजित सिंहच्या आवाजातील “तुम्हें कितना प्यार करते हैं” हे रोमॅंटिक गाणे बॅंकग्राऊंडला ऐकू येत आहे.

चित्रपटाच्या टीझर पाहून प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत, “एवढा सुंदर चित्रपट ओटीटीवर नाही तर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित व्हायला हवा होता”, दुसऱ्या एका युजरने “चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय एकदम चुकीचा आहे” अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान, २१ जुलैला ‘बवाल’ अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor and varun dhawan starrer bawaal movie teaser released sva 00