OTT Release This Week: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. हा वीकेंड चित्रपट आणि मालिका प्रेमींसाठी मजेदार असेल. प्रेक्षक घरी बसून त्यांच्या कुटुंबासह ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकतील. या यादीत सैफ अली खान स्टारर ‘ज्वेल थीफ’ ते पृथ्वीराजचा ‘एल२: एम्पुरान’ यांचा समावेश आहे. २१ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घ्या.

ज्वेल थीफ

Jewel Thief- The Heist Begins on Netflix : सैफ अली खान, जयदीप अहलावत व निकिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ज्वेल थीफ’ हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, जो लोकांना आवडला होता. या चित्रपटात सैफ एका चोराच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला जयदीप ५०० कोटी रुपयांचा आफ्रिकन रेड सन डायमंड चोरण्याचे काम देतो. सैफ-जयदीप व्यतिरिक्त, कुणाल कपूरसह अनेक स्टार्स यात दिसणार आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

क्रेजी

Crazxy on OTT : सोहम शाह स्टारर ‘क्रेझी’ हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. ‘क्रेझी’ २१ एप्रिल रोजी हिंदीमध्ये प्राइम व्हिडिओमध्ये प्रदर्शित झाला आहे. तुम्ही जर हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला असेल, तर तुम्ही तो घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.

एल 2: एम्पुरान

L2: Empuraan on OTT : पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘L2: Empuraan’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात गुजरात दंगलींची कथा दाखवण्यात आली असल्याने त्यावरून बरेच वाद निर्माण झाले. यामध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, क्राइम आणि थ्रिलर सर्वकाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सध्या ओटीटीवर मल्याळम भाषेत उपलब्ध आहे. तो तुम्हाला जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. हा चित्रपट हिंदीमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

अय्याना माने

Ayyana Mane on OTT : ‘अय्याना माने’ ही कन्नड भाषेतील एक वेब सीरिज आहे. ही एका नव्या नवरीची कहाणी सांगते. तिला तिच्या वडिलोपार्जित घरात विचित्र गोष्टी जाणवतात आणि त्यानंतर जे घडते ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. ही सीरिज २५ एप्रिल रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

लॉगआउट

बाबिल खानची मुख्य भूमिका असलेला ‘लॉगआउट’ हा चित्रपट दिल्लीत घडणारा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. या सिनेमाची कथा २६ वर्षीय एन्फ्लुएन्सर प्रत्युषची आहे, ज्याचे फॉलोअर्स १ कोटी होणार असतात. पण एका चाहत्याने त्याचा फोन हॅक केल्यावर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लॉगआउट आता झी 5 वर स्ट्रीम होत आहे. हा सिनेमा १८ एप्रिलला रिलीज झाला होता. तुम्ही तो पाहिला नसेल तर या वीकेंडला पाहू शकता.