JioHotstar Subscription Plans: जिओस्टारने आपल्या युजर्ससाठी जिओहॉटस्टार हे नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. जिओ सिनेमा व डिस्ने प्लस हॉटस्टार हे दोन अ‍ॅप विलीन करून हे प्लॅटफॉर्म तयार केले आहे. आता युजर्स जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट एकाच ठिकाणी पाहू शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साथून जिओस्टारने हे नवीन जिओहॉटस्टार हे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. वायकॉम 18 आणि स्टार इंडिया यांनी करार केल्यानंतर या दोन्ही अ‍ॅपचे विलिनीकरण करायचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्स मर्ज झाले असून प्रेक्षकांना या दोन्ही अ‍ॅपवरील त्यांचा आवडता कंटेंट जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे. तुम्ही या दोन्ही अ‍ॅपचे युजर्स असाल, तर या नवीन जिओहॉटस्टारच्या सबस्क्रिप्शन प्लॅनबद्दल जाणून घ्या.

जिओहॉटस्टारचे प्लॅन व त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

मोबाईल सबस्क्रिप्शन प्लॅन

हा प्लॅन अशा लोकांसाठी आहे जे फक्त त्यांच्या मोबाईलवर हे अ‍ॅप पाहतात. यात तुम्ही 720p रिझोल्यूशन (क्वालिटी) आणि स्टिरिओ साउंडमध्येच कंटेंट पाहू शकाल. तुम्हाला जिओहॉटस्टारचा मोबाईल सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला ३ महिन्यांसाठी १४९ रुपये मोजावे लागतील. तर एका वर्षासाठी ४९९ रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन घेतल्यावर तुम्ही १४९ रुपयांत तीन महिने तुमचा आवडता कंटेंट पाहू शकता.

जिओहॉटस्टारचा सुपर प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्ही टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल यांसारख्या कोणत्याही दोन डिव्हाइसवर एकाच वेळी तुम्हाला हवा तो कंटेंट या अॅपवर पाहू शकता. यात फुल एचडी (1080p) रिझोल्यूशन आणि डॉल्बी ॲटमॉस साउंड असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे आवडते चित्रपट, शो, वेब सीरिज, मालिका आणखी चांगल्या क्वालिटीत पाहता येईल. हा प्लॅन ३ महिन्यांसाठी हवा असेल तर तुम्हाला २९९ रुपये खर्च करावे लागतील. तसेच या सबस्क्रिप्शन प्लॅनचा वर्षभराचा खर्च ८९९ रुपये आहे.

जिओहॉटस्टारचा नवीन लोगो (सौजन्य – पीआर)

जिओहॉटस्टारचा प्रीमियम प्लॅन

हा जिओहॉटस्टारचा प्रीमियम प्लॅन आहे. यामध्ये तुम्ही एकाच वेळी ४ डिव्हाइसवर (टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइल) व्हिडीओ पाहू शकता. यात 4K (2160p) रिझोल्यूशन, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ॲटमॉस साउंड असेल. प्रीमियम प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे हा प्लॅन घेतल्यानंतर युजरला जाहिराती दिसत नाही. यात फक्त लाइव्ह कंटेंटमध्ये येणाऱ्या जाहीरातीच दिसतील. हा प्लॅन ३ महिन्यांसाठी हवा असेल तर तुम्हाला ४९९ रुपये खर्च करावे लागतील. तर एक वर्षासाठी हा प्लॅन घेण्यासाठी तुम्हाला १४९९ रुपये मोजावे लागतील.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jiohotstar subscription plans for 3 months 1 year mobile plan super plan premium details hrc