टीव्हीएफच्या ‘पंचायत’, ‘कोटा फॅक्टरी’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारून अभिनेता जितेंद्र कुमार याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अभिनेता जितेंद्र कुमारला ‘जितू भैय्या’ म्हणून लोकप्रियता मिळाली आहे. ‘कोटा फॅक्टरी’सह टीव्हीएफच्या अनेक लोकप्रिय प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जितेंद्र एकेकाळी झोपडीत राहायचा, अशी आठवण त्याने सांगितली. सायरस ब्रोचा याने घेतलेल्या मुलाखतीत, जितेंद्रला त्याच्या पहिल्या घराबद्दल विचारलं असता, त्याने राजस्थानमधील अलवर जिल्ह्याच्या खैरथल गावात त्याचा जन्म झाल्याच सांगितलं. तिथेच तो जंगलातील झोपडीत राहिला होता, असं त्याने सांगितलं.

जितेंद्र म्हणतो, “आमचं एक घर जंगलात होतं. आमचं एकत्र कुटुंब तिथे राहत होतं. आमचं एक पक्कं घर होतं आणि एक झोपडी होती. मी अनेकदा झोपडीत झोपत होतो, या आठवणी खूप ठळकपणे आठवतात आणि तेव्हा मला खूप विचित्र वाटायचं.. माझे काका आणि बाबा सिव्हिल इंजिनियर आहेत, यामुळे त्यांनीच नंतर आमच्या घरात आणखी दोन खोल्या बांधल्या. पण, तोपर्यंत सहा-सात महिने आम्ही झोपडीत राहिलो.”

हेही वाचा…ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर होत आहेत प्रदर्शित, वाचा यादी

जितेंद्र म्हणाला, मी रोजंदारीवर काम केलं

जितेंद्रने आयआयटी खडगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तो लहान असताना त्याने सुट्टीत कसं रोजंदारीवर काम केलं हे सांगितलं. “उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी पेंटर आणि सुतारांबरोबर रोजंदारीवर काम करायचो. मला दररोज ४० रुपये मिळायचे. मग जेव्हा बाबांना हे कळायचं तेव्हा ते मला ओरडायचे. मी ११-१२ वर्षांचा होतो आणि कामगारांना मदत करायचो, ???त्यामुळे मला घर बांधण्याची प्रक्रिया समजली ,असं तो सांगतो.

जितेंद्र कुमारला ‘कोटा फॅक्टरी’मधील ‘जितू भैय्या’मुळे खरी ओळख मिळाली. त्याचबरोबर प्राइम व्हिडीओच्या ‘पंचायत’ या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतल्या त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं.

हेही वाचा…थ्रिलर, सस्पेन्स आणि क्राइमचा थरार अनुभवायचा आहे? मग एकदा पाहाच ‘या’ दाक्षिणात्य वेब सीरिज…

जितेंद्र कुमारला कसा मिळाला पहिला शो?

आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना जितेंद्र कुमार नाटकही करायचा. त्यावेळी त्याची भेट द व्हायरल फिव्हचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर विश्वपती सरकार यांच्याशी भेट झाली. ते जितेंद्रचे सिनिअर होते, पण सरकार यांनी त्याला टीव्हीएफ जॉईन करण्यास सांगितले.खरगपूरमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर जितेंद्र तीन महिने बेरोजगार होता, त्यानंतर बंगळुरूमधील एका जपानी कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पण त्यानंतर विश्वजीत सरकार यांनी त्यांना टीव्हीएफसाठी बोलावलं. जितेंद्र त्यांना भेटायला गेला आणि त्याला तिथे त्याचा पहिला शो ‘मुन्ना जज्बाती’ भेटला. ही सीरिज हिट झाली आणि जितेंद्रने मागे वळून पाहिलं नाही. त्याने ‘कोटा फॅक्टरी’, ‘बॅचलर’, ‘ड्राय डे’, ‘जादुगर’, ‘चमन बहार’, ‘पंचायत’, ‘ड्राय डे’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.