९० च्या दशकात जन्मलेल्या सर्वांचच ज्युरॅसिक सीरिजशी एक वेगळंच नातं आहे. १९९३ साली मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा डायनासॉरची रोमांचक आणि काहीशी भीतीदायक दुनिया दाखवण्यात आली आणि त्यानंतर हे चालूच राहिलं. २०२२ मध्ये या सीरिजचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं नाव होतं ‘ज्युरॅसिक वर्ल्ड डोमिनियन’. या चित्रपटाला अर्थातच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पण अनेकांना हा चित्रपट त्यावेळी चित्रपटगृहात पाहता आला नव्हता. अशा सर्वांसाठीच आता आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘ज्युरॅसिक वर्ल्ड डोमिनियन’ या चित्रपटानंतर या आयकॉनिक सीरिजचा पुढे कोणताही चित्रपट येणार नाहीये. म्हणजे हा या सीरिजमधील अखेरचा चित्रपट आहे. या सीरिजची सुरुवात १९९३ मध्ये ‘ज्युरॅसिक पार्क’ या चित्रपटाने झाली होती. या सीरिजमधील सगळेच चित्रपट सुपरहिट राहिले आहेत.

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा

आणखी वाचा- Bigg Boss 16 : शालीन भानोतने दिली चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरांना धमकी, व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी संतापले

कोलिन ट्रेवोरो यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘ज्युरॅसिक वर्ल्ड डेमिनियन’ या चित्रपटात क्रिस प्रॅट, बॉयस डलास होवार्ड यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय लॉरा डर्नी, जेफ गोल्डब्लम आणि सॅम नील यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जे याआधीच्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड डोमिनियन’ हा चित्रपट यावर्षी १० जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूप चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.

आणखी वाचा- रेखा यांचं नाव ऐकून भडकले होते अमिताभ बच्चन, सर्वांसमोर केला होता पत्नी जया यांचा अपमान

‘ज्युरॅसिक वर्ल्ड डेमिनियन’ येत्या १७ ऑक्टोबरला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, इंग्रजीसह हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही पाहता येणार आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमधील हा ६ वा चित्रपट आहे. या सीरिजची सुरुवात १९९३ मध्ये झाली होती आणि २००१ पर्यंत याचे २ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर २०१५, २०१८ आणि २०१९ पुढचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते.

Story img Loader