Noor Malabika Das found dead: बॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काजोलबरोबर ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. ३७ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्री नूर मालाबिका दास ही तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती, त्यानंतर ओशिवरा पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, शेजाऱ्यांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांना तिच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिसांना माहिती दिली. पथकाने घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा तोडला असता नूरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अभिनेत्रीचा मृतदेह पोलिसांनी तिच्या लोखंडवाला येथील फ्लॅटमधून ६ जून रोजी जप्त केला होता. नूरने बेडरूममधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई केली. मात्र, तिच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल…
तपासादरम्यान नूरच्या घरातून पोलिसांनी औषधं, तिचा मोबाईल फोन आणि डायरी जप्त केली. अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आला. तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणीही आलं नाही. कुटुंबातील कोणीही मृतदेह घेण्यासाठी न आल्याने पोलिसांनी शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रविवारी ९ जून रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी करणार लग्न, तारीख ठरली
नूर मालाबिका ही मूळची आसामची होती. तिने अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात ‘सिसकियां’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ या चित्रपटांचा समावेश आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘द ट्रायल’मध्ये ती शेवटची दिसली होती. या मालिकेत काजोलशिवाय जिशू सेनगुप्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता.
…म्हणून १२८ मिलियन व्ह्यूज असलेलं ‘बदो बदी’ गाणं युट्यूबने केलं डिलीट, पाकिस्तानी गायकाला कोसळलं रडू
नूर सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिचे लाखो फॉलोअर्स आहे. नूर तिच्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जायची. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या चित्रपट, वेब सीरिजसंदर्भात अनेक पोस्ट आहेत. याशिवाय तिचे बरेच फोटो व व्हिडीओ पाहायला मिळतात.