Kalki 2898 AD OTT release: अमिताभ बच्चन, प्रभास व दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा २०२४ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘कल्की 2898 एडी’ ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट एक नाही तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amotabh Bachchan) व दीपिका पादुकोण अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. २७ जून रोजी हा सिनेमा जगभरात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग केली होती. त्यानंतरही या चित्रपटाने सातत्याने चांगली कमाई करत बॉक्स ऑफिस गाजवलं. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

Munjya on TV: सुपरहिट ‘मुंज्या’ OTT नव्हे तर टीव्हीवर होतोय प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Kalki 2898 AD Total Collection: या चित्रपटाने जगभरात १०४२ कोटी रुपयांहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. त्यापैकी ७६७ कोटी या चित्रपटाने फक्त भारतात कमावले आहेत. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर हा आता ओटीटीवर येणार आहे. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना तो ओटीटीवर पाहता येईल. खास म्हणजे हा चित्रपट दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर येणार ‘कल्की 2898 एडी’

जूममध्ये प्रदर्शित झालेला ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट २२ ऑगस्टपासून नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येईल. दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी याबाबत इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे. हिंदी ‘कल्की 2898 एडी’ २२ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. तर, तामिळ, तेलुगू व कन्नड भाषेतील चित्रपट २२ ऑगस्टपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

Kalki 2898 AD OTT release
Kalki 2898 AD चित्रपटाचे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वथामाची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात एसएस राजामौली, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांच्यासह अनेक स्टार्स पाहुण्या भूमिकेत आहेत.

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं देवदर्शन, शेअर केले खास Photos

‘कल्की 2898 एडी’ च्या सीक्वेलची तयारी चालू

‘कल्की 2898 एडी’ च्या पहिल्या भागाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर निर्माते चित्रपटाच्या सीक्वेलची तयारी करत आहेत. या सीक्वलमध्ये कर्ण-अश्वत्थामा व यास्किन समोरासमोर येतील. या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादमध्ये जन्म, दमदार पदार्पण अन् सुपरहिट सिनेमे करून बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय अभिनेत्री

‘कल्की 2898 एडी’ चे बजेट किती?

Kalki 2898 AD Budget: ‘कल्की 2898 एडी’ हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. तब्बल ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे.

Story img Loader