Kalki 2898 AD OTT release Update: अमिताभ बच्चन, प्रभास व दीपिका पादुकोण यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २७ जून रोजी हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करून अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले होते. त्यानंतरही या चित्रपटाने सातत्याने चांगली कमाई केली. अजूनही चित्रपटगृहांमध्ये असलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Kalki 2898 AD box office collection: या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १०२९ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. यापैकी २७४.२० कोटी रुपये चित्रपटाने विदेशात कमावले असून उर्वरित कमाई भारतात केली आहे. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचं म्हटलं जात आहे.

kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Kalki 2898AD OTT release
‘कल्की 2898 एडी’ भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘कल्की 2898 एडी’

प्रभास, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादुकोण असे सुपरस्टार असलेला ‘कल्की 2898 एडी’ जूनमध्ये प्रदर्शित झाला. इंग्लिश जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम व कन्नडमध्ये इंग्रजी सबटायटल्ससह रिलीज केला जाईल. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वथामाची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात एसएस राजामौली, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांच्यासह अनेक स्टार्स पाहुण्या भूमिकेत आहेत.

धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी!

‘कल्की 2898 एडी’ चा दुसरा भाग येणार

Kalki 2898 AD part 2: ‘कल्की 2898 एडी’ चा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे, आता निर्माते चित्रपटाच्या सीक्वेलची तयारी करत आहेत. या सीक्वलमध्ये कर्ण-अश्वत्थामा व यास्किन समोरासमोर येतील. पहिला भाग सुपरहिट ठरल्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत ८ महिन्यात वेगळी झाली अभिनेत्री, आता तो गर्लफ्रेंडसह आला मुंबईत, फोटो व्हायरल

भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक

Kalki 2898 AD Budget: ‘कल्की 2898 एडी’ हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. तब्बल ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. वैजयंती मुव्हीज निर्मित या चित्रपटात दिग्गज कलाकार आहेत.

Story img Loader